TRENDING:

दौंड रेल्वे उड्डाणपुलाखाली उभा होता गोव्याहून आलेला मोठा ट्रक; मागचं शटर उघडलं अन् सारेच चक्रावले

Last Updated:

जेव्हा पथकाने ट्रकचे मागील शटर उघडले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दौंड: पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागताच, छुप्या मार्गाने होणारी अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. दौंडमध्ये एक अशीच मोठी कारवाई करण्यात आली. यात 'गोवा' बनावटीच्या विदेशी दारूचा तब्बल दीड कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
गोव्याहून आलेला मोठा ट्रक (AI Image)
गोव्याहून आलेला मोठा ट्रक (AI Image)
advertisement

नेमकी कारवाई कशी झाली?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, गोव्याहून एक संशयास्पद ट्रक दौंडमार्गे जाणार आहे. या माहितीच्या आधारे दौंड रेल्वे उड्डाणपुलाजवळ सापळा रचण्यात आला. सहा चाकी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्र. MH 18 BG 2304) तिथे येताच पथकाने त्याला घेराव घातला.

११ हजार बॉक्स पाहून अधिकारी थक्क

advertisement

जेव्हा पथकाने ट्रकचे मागील शटर उघडले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले. ट्रकच्या आत घरगुती सामानाचा किंवा इतर मालाचा कोणताही आडोसा नव्हता, तर छतापर्यंत 'बनावट गोवा ब्रँड'च्या विदेशी दारूचे बॉक्स थप्पी लावून रचले होते. एकूण ११ हजार दारूचे बॉक्स आणि ट्रक असा मिळून दीड कोटींचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला.

advertisement

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

या प्रकरणी युसुफ शेख नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी या दारूचा वापर होणार होता का? याचा तपास आता निरीक्षक विजय रोकडे आणि प्रदीप झुंजरुक करत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
दौंड रेल्वे उड्डाणपुलाखाली उभा होता गोव्याहून आलेला मोठा ट्रक; मागचं शटर उघडलं अन् सारेच चक्रावले
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल