व्हिडीओमध्ये सुरूवातीला भव्य जुन्या वाड्याचे दर्शन घडते. वाड्याच्या बाहेर 'गरमा गरम वडापाव' अशी आकर्षक पाटी लावलेली आहे. वाड्यातील आतल्या रस्त्याचे दृश्यही दाखवले आहे. वडापावच्या दुकानाजवळ पोहोचल्यावर, दुकानात बसलेल्या महिलांना बटाटे कुसकताना, हिरवी मिरची तळताना आणि नंतर गरमागरम वडापाव सर्व्ह करताना पाहता येते. या संपूर्ण प्रक्रियेत वडापाव किती खुसखुशीत आणि चवदार तयार होतो, हे पाहून पाहणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.
">http://नारायण पेठ येथील हे वडापाव विक्रेते महिलांच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले वडापाव खाण्यासाठी लोकांची गर्दी नेहमीच असते. सध्या ''foodland.pune'' या इन्स्टाग्राम युझरने हा व्हिडीओ शेअर केला असून, त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता प्रचंड वाढली आहे. अनेकांनी व्हिडीओखाली प्रतिक्रिया देत वडापाव चाखण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काहींनी लिहिले आहे, ''एक नंबर वडापाव आहे'', तर काहींनी म्हटले, ''पुणे शहरातील सर्वात बेस्ट वडापाव''
पुण्यात विविध पारंपरिक पदार्थांचा अनुभव घेता येतो. मस्तानी, कांदे पोहे, भेळ, साबुदाणा खिचडी, झुणका भाकर, बाकरवडी आणि इतर पारंपरिक पदार्थ खवय्यांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. यापैकी हे ठिकाण वडापावसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. या पारंपरिक पदार्थांचा अनुभव घेण्यासाठी लोक या ठिकाणी आवर्जून येतात.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे, नारायण पेठ येथील 130 वर्ष जुन्या वाड्यातील वडापावच्या दुकानावर पुणे आणि इतर शहरातील खवय्यांची गर्दी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक खाद्यप्रेमींनी आणि पर्यटकांनी या पारंपरिक वडापावची चव चाखून त्यांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करण्याची तयारी सुरू केली आहे.
अशा पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेणे फक्त खाण्यापुरते मर्यादित नाही, तर पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचा देखील भाग आहे. गरमागरम वडापाव आणि पारंपरिक पदार्थांचा आनंद घेण्यासाठी नारायण पेठ येथे भेट देणे आता खवय्यांसाठी अनिवार्य ठरले आहे