456 वर्षे जुना पान दरवाज्याला नव रूप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध कारागीर प्रल्हाद आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 30 कुशल कारागीर या दरवाजाच्या निर्मितीचे काम करत आहेत. या कामासाठी अंदाजे सहा ते सात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सुमारे 700 किलो सागवानी लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रकडून खरेदी करण्यात आले आहे. यासाठी श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवा मंडळाकडून 3 लाख 53 हजार 737 रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या 12 फूट उंची आणि 8 फूट रुंदीच्या दरवाजाचे काम सुरू आहे.
advertisement
Pune: उत्खनन झालं, सापडला 12 लाख वर्षांआधीचा पुरावा! डेक्कन कॉलजेच्या संशोधन विभागाचा Video
इतिहासाची साक्ष देणारा पान दरवाजा..
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या पश्चिम बाजूस, इंद्रायणी नदीकडे असलेला पान दरवाजा हा मंदिरातील अत्यंत महत्त्वाचा दरवाजा आहे. याच दरवाजातून माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश दिला जातो. मंदिराच्या मुख्य प्रदक्षिणा मार्गाशी जोडलेला असल्याने येथे दररोज मोठी वर्दळ असते. इतिहासानुसार, याच दरवाजातून निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई यांनी माऊलींना अंतिम निरोप दिला होता. 1570 मध्ये बांधलेल्या मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वारांपैकी हा दरवाजा असून, सुमारे 456 वर्षे जुन्या या दरवाजाच्या रचनेप्रमाणेच नवीन दरवाजा तयार करण्यात येत आहे.






