TRENDING:

पान खाल्ल्यानंतर येतेय गुंगी! मग तुम्हीही शिकार झालात का? पुण्यात 'कडक फुलचंद' पानाच्या नावाखाली ड्रग्जचा बाजार; नेमकं काय आहे प्रकरण?

Last Updated:

तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी हिंजवडी जवळील जांबेगाव येथील 'चैतन्य फूड गोडाऊन'वर धाड टाकली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या आवडीच्या 'पाना'ला आता नशेचा विळखा पडला आहे. 'कडक फुलचंद' या पानाच्या नावाखाली पांढऱ्या पावडरमध्ये घातक अंमली पदार्थांचे मिश्रण करून विक्री करणाऱ्या एका टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. लोणी काळभोर, हिंजवडी आणि चिंचवड परिसरात राबवलेल्या या विशेष मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली द्रव्यांचा मोठा साठा जप्त केला असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य टोळ्यांशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
News18
News18
advertisement

लोणी काळभोर येथील 'मैफिल पान हाऊस'वर पोलिसांनी छापा टाकला असता, तिथे मिळणाऱ्या पांढऱ्या पावडरमध्ये अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स आणि मेथॅम्फेटामाइन यांसारखी मानवी मेंदूवर घातक परिणाम करणारी द्रव्ये आढळली. याप्रकरणी आकुर्डी येथील कैलास मांढरे आणि अनुराधा मांढरे या दांपत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पावडरची किंमत बाजारपेठेत 80  हजार रुपये प्रति किलो इतकी आहे.

advertisement

हिंजवडी आणि चिंचवडमध्ये टाकली धाड

तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी हिंजवडी जवळील जांबेगाव येथील 'चैतन्य फूड गोडाऊन'वर धाड टाकली. या ठिकाणी चक्क अशा नशिल्या भुकटीचे उत्पादन केले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिथून 6.63 लाख रुपयांचा मुद्देमाल, काळे द्रावण आणि एक कार जप्त केली आहे. दुसरीकडे, चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील 'मंगलमूर्ती पान स्टॉल'वर छापा टाकून पोलिसांनी ज्ञानेश्वर नामदेव वानखेडे याला अटक केली असून त्याच्याकडून 710 ग्रॅम अंमली पदार्थ मिश्रित पावडर जप्त केली आहे.

advertisement

रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण?

अनेक नागरिकांनी पान खाल्ल्यानंतर प्रचंड गुंगी येत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी 'पोर्टेबल ड्रग्ज टेस्टींग किट'चा वापर करून घटनास्थळीच पावडरीची तपासणी केली आणि हे रॅकेट उघडकीस आले. या भयंकर प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलीस आता या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? याचा शोध घेत आहेत.

advertisement

पुण्यात ड्रग्सचं आंतराष्ट्रीय रॅकेट उघड

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

विद्येचं माहेरघर अशी बिरुदावली मिरवणारे पुणे गेल्या काही दिवसांत सातत्याने चर्चेत येत आहे. पुण्यात ड्रग्सचं आंतराष्ट्रीय रॅकेट उघड झाल्याने खळबळ उडाली होती. पुण्यातल्या तरुणाईला झालंय काय असा प्रश्न आता वारंवार उपस्थित राहत आहे. ललित पाटील ड्रग्ज रॅकेट, पोर्शे कार अपघात अशा प्रकरणांमुळे पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा हा खेळ सर्वांसमोर आला आहे. पुण्यातील तरुणाई आज अंमली पदार्थ आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे भीषण वास्तव आहे. रात्रभर पबमध्ये नशेत झिंगणाऱ्यांचे एक वेगळेच विश्व पुण्यात रात्री पाहायला मिळत असल्याने ही नक्कीच धोक्याची घंटा समजली जात आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढत आहे. पूर्वी अफीम, कोकेन, गांजा, चरस याच्या आहारी जाणाऱ्या तरुणांमध्ये आता नशेचा ट्रेंडदेखील बदलला आहे. आता कोकेन, मेफेड्रोन (एम.डी), एलएसडी स्टॅम्प, एमडीएमए, मशरूम आणि हशिश तेल याचा वापर नशेसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पान खाल्ल्यानंतर येतेय गुंगी! मग तुम्हीही शिकार झालात का? पुण्यात 'कडक फुलचंद' पानाच्या नावाखाली ड्रग्जचा बाजार; नेमकं काय आहे प्रकरण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल