TRENDING:

पुण्यातून कोट्यवधींची लूट, EDच्या छाप्यात 7 किलो सोनं जप्त अन् इतका पैसा की मोजायला मशीन लागलं; जागतिक सायबर घोटाळा उघड

Last Updated:

Fake Call Center In Pune: पुण्यातील एका बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची लाखो डॉलर्सची फसवणूक उघडकीस आली आहे. या प्रकरणी ईडीने दोन आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने आणि क्रिप्टो मालमत्ता जप्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली/पुणे: पुणे येथील एका बनावट कॉल सेंटरमार्फत अमेरिकन नागरिकांची लाखो डॉलर्सची फसवणूक करून केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी प्रवर्तन निदेशालयाने (ईडी)ने ही माहिती दिली.
News18
News18
advertisement

ईडीने ही अटक ‘मॅग्नेटेल बीपीएस कन्सल्टंट्स अँड एलएलपी’ या संस्थेविरोधात सायबर फसवणूक प्रकरणी अहमदाबाद, जयपूर, जबलपूर आणि पुणे येथे केलेल्या छाप्यानंतर केली आहे.

अभिनेत्रीचा 8 महिन्यापूर्वी मृत्यू, सापडला सडलेला मृतदेह, पोस्टमार्टम अपयशी; आता ‘मूक साक्षीदार’ सांगणार मृत्यूचं गूढ

तपास यंत्रणेला छाप्यादरम्यान 7 किलोग्रॅम सोने, 62 किलोग्रॅम चांदी, 1.18 कोटी रुपये रोख रक्कम आणि 9.2 कोटी रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

advertisement

ईडीने सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख संजय मोरे आणि अजीत सोनी अशी झाली आहे. हे दोघेही संबंधित कंपनीचे भागीदार असून त्यांना जयपूर येथून अटक करण्यात आली आहे.

ईडीने पुणे सायबर पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरचा आधार घेत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या एफआयआरमध्ये एकूण आठ जणांचे नाव असून, त्यांनी पुणे येथील प्राईड आयकॉन बिल्डिंगच्या 9व्या मजल्यावर जुलै 2024 पासून बनावट कॉल सेंटर चालवले होते. या आरोपींनी "बनावट कर्ज योजना"द्वारे अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केले होते.

advertisement

प्राथमिक चौकशीत असे उघड झाले आहे की, आरोपींनी स्वत:ला बँकेचे प्रतिनिधी म्हणून ओळख करून देत बनावट कर्जाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी या नागरिकांकडून बँक खात्यांचे तपशील आणि अन्य संवेदनशील माहिती मिळवली आणि त्याचा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला.

ईडीच्या मते, फसवणुकीच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम लाखो अमेरिकन डॉलर्समध्ये आहे. हा गोरखधंदा अमेरिका स्थित सहकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आला आणि त्यानंतर ही रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये विशेषतः USDT मध्ये रूपांतरित करण्यात आली.अशा प्रकारे मिळवलेली डिजिटल मालमत्ता ट्रस्ट वॉलेट आणि एक्सोडस वॉलेट यांसारख्या क्रिप्टो वॉलेटमध्ये साठवण्यात आली होती.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातून कोट्यवधींची लूट, EDच्या छाप्यात 7 किलो सोनं जप्त अन् इतका पैसा की मोजायला मशीन लागलं; जागतिक सायबर घोटाळा उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल