या कार्यक्रमाचे संयोजन वीरेंद्र चित्राव यांनी केले असून त्याचबरोबर संचालक अभिषेक अवचार, सचिव विश्वास शेंबेकर, मराठवाडा कॉलेजचे प्रतिनिधी संतोष शेणई आणि नूतन कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी फेस्टिव्हलच्या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या सहभागाने हा महोत्सव साजरा केला जात आहे. उद्घाटन सोहळा 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय,लॉ कॉलेज रस्त्यावर ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा 28 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केला आहे. यावेळी लघुचित्रपट निर्माते, तीन मास्टर क्लासेस आणि दिग्दर्शक-निर्मात्यांचा खुला संवाद आणि चर्चासत्रेही घेण्यात येणार आहेत.
advertisement
'या' ठिकाणी पाहता येणार चित्रपट
चित्रपटांचे प्रदर्शन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पंडित नेहरू नाट्यगृह आणि मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज या तीन ठिकाणी केले जाणार असल्याचे संयोजक चित्राव यांनी सांगितले. महोत्सवाचा उद्देश भारतातील चित्रपट इतिहासातील दुर्मीळ चित्रपट, लघुचित्रपट, माहितीपट आणि चित्रपट-संबंधित सामग्रीचे संरक्षण करणे आहे. तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी हा वारसा जपणे आणि चित्रपटप्रेमींना तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन उत्तम निर्माते तयार करण्यास मदत करणे हे महत्त्वाचे लक्ष्य आहे.
महोत्सवासाठी निवड प्रक्रिया विशेष होती. देशभरासह अमेरिका, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, चीन, इटली, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ब्राझील, स्पेन, रशिया, कॅनडा, अर्जेंटिना, इराण, तुर्की, थायलंड, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया अशा 33 देशांमधून 1,428 चित्रपट प्राप्त झाले. त्यापैकी 105 उत्कृष्ट चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या निवडीत 25 फीचर फिल्म्स, 75 पेक्षा जास्त लघुचित्रपट, माहितीपट तसेच ॲनिमेशन फिल्म्सचा समावेश आहे.
या महोत्सवाद्वारे प्रेक्षकांना केवळ चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी नाही तर चित्रपटसंरक्षण आणि निर्मितीच्या कला शिकण्याची देखील संधी मिळणार आहे. चित्रपटप्रेमींनी हा पाच दिवसांचा उत्सव नक्की अनुभवावा अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.