पण हे सर्व आरोपी दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत. मग यांनी तुरुंगात राहून गणेश काळेची हत्या कशी घडवून आणली असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता पुणे पोलिसांनी याची उकल केली आहे. गणेश काळेच्या हत्येची सुपारी तब्बल सहा महिने आधी दिली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी बंडू आंदेकरने कोंढवा परिसरात वर्चस्व असलेल्या आमिर खानला सुपारी दिल्याची माहिती समोर आलं आहे.
advertisement
कोंढव्यातील खुनाचा सूत्रधार बंडू आंदेकरने ६ महिन्यांपूर्वीच गणेश काळेच्या खुनाची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. आंदेकरने दिलेली सुपारी कोंढवा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख आमिर खानने कारागृहातून वाजवली आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी ४५ हजार रुपये दिले होते. मात्र, हे दीर्घकालीन प्लॅनिंग पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले? हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. कोंढव्यातील खडी मशीन चौकात भरदिवसा झालेल्या गोळीबारात रिक्षाचालक गणेश काळे याचा खून करण्यात आला. हा खून वनराज आंदेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुण्यात टोळीयुद्ध का भडकलं आहे?
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकरची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तसेच कोयत्याने वार करण्यात आले होते. ही हत्या वनराजचे सख्खे दाजी गणेश कोमकर, जयंत कोमकर आणि सोम्या गायकवाडच्या टोळीने केली होती. संपत्ती आणि वर्चस्व वादाच्या कारणातून ही हत्या करण्यात आली होती. या आंदेकर टोळीने बदला घेण्याची शपथ घेतली होती. पण वनराजचे सर्व मारेकरी आता तुरुंगात आहेत. त्यामुळे आंदेकर टोळीकडून आरोपींच्या कुटुंबीयांना टार्गेट करण्यात येत आहे.
