मयत गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील आरोपी समीर काळेचा भाऊ आहे. त्यामुळे आंदेकर टोळीकडूनच ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना होता. शिवाय अटक केलेल्या आरोपींपैकी एकजण आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा नातू स्वराज वाडेकरचा मित्र आहे. त्यामुळे ही हत्या टोळीयुद्धातून झाली, असून यामागे आंदेकर टोळी असावी, असा संशय पोलिसांना होता. आता हा संशय खरा ठरला आहे.
advertisement
गणेश काळेच्या हत्येमागं आंदेकर टोळीच असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, आयुष कोमकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर यांनीच तुरुंगात बसून फिल्डिंग लावून गणेश काळेची हत्या घडवून आणली. यावर पोलिसांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी बंडू आंदेकरसह एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, आमिर खान, मयूर वाघमारे, स्वराज वाडेकर, अमन शेख, अरबाज पटेल आणि इतर दोन अल्पवयीन आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. या सर्वांना आज दुपारी कोंढवा पोलीस कोर्टात हजर करणार आहेत. दोन महिन्यापूर्वी आंदेकर टोळीने वनराज हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला टार्गेट केलं होतं. यानंतर आता समीर काळेच्या भावाला टार्गेट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील गँगवॉर आणखी भडकण्याची भीती पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
