गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात होण्याआधीचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे.या सीसीटीव्हीमध्ये कार अपघात होण्यापूर्वी गाडीत 2 जण असल्याचे स्पष्ट होत आहे.त्यापैकी एकजण पेट्रोल पंपावर उतरला होता. तर दुसरा तरूण कार घेऊन पुढे निघाला होता. हा दुसरा कोण होता? हे स्पष्ट होऊ शकले नाही आहे. पण या पेट्रोल पंपावरून पुढे जाताच गौतमीच्या कारने एका रिक्षाचालकाला धडक दिली होती. वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला गौतमी पाटीलच्या एका वाहनाने धडक दिली होती.
advertisement
गौतमी पाटीलला नोटीस
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात झालेल्या अपघातप्रकरणी चौकशी करण्यासाठी गौतमी पाटील हिला नोटीस बजावण्यात आली आहे. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना कॉल करून गौतमीवर कारवाई करायचीय की नाही? असा सवाल उपस्थित करून दबाव टाकल्याची टीका होताना दिसतीये. अशातच पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.
चौकशीसाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती
गौतमी पाटील हिच्या गाडीला झालेल्या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) आता तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा केवळ अपघात होता की त्यामागे काही अन्य कारण होते, याचा छडा लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
अपघात झाल्यावर गाडी बाजूला करण्यासाठी क्रेन कोणाकडून बोलावण्यात आली? यासाठी कोणी फोन केला आणि त्याचा उद्देश काय होता, याचा सविस्तर तपास केला जाईल. अपघाताच्या वेळी गौतमी पाटील वापरत असलेली गाडी कुठून आणली होती? ही गाडी भाड्याची होती की अन्य कोणाची, याबद्दलची कागदपत्रे आणि माहिती तपासली जाईल. या घटनेच्या आणि त्यापूर्वीच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. यामुळे गाडीचा वेग, अपघाताचे नेमके कारण आणि अपघातानंतर काय घडले, याचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होऊ शकेल.