केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 20 वर्षांहून जुनी वाहने नोंदणीसाठी नवे शुल्क ठरवले आहे. ही नवीन तरतूद केंद्रीय मोटार वाहन नियम 2025 या नावाने लागू होईल. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीत सध्या 40 लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी आहे. वाहनधारकांसाठी ही नव्या नियमांनुसार नोंदणी करणे अनिवार्य आहे अन्यथा दंड आकारला जाईल.
advertisement
नोंदणीसंबंधी नियम असे आहेत की एखाद्या वाहनाची नोंदणी घेतल्यावर ती 15 वर्षांसाठी वैध राहते. 15 वर्षानंतर वाहनधारकांना पर्यावरण कर भरून पुनर्नोंदणी करावी लागते. जर वाहनधारकांनी ही नोंदणी केली नाही तर दुचाकी वाहनांसाठी महिन्याला 300 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी महिन्याला 500 रुपये दंड आकारला जाईल. शहरात तरी अनेक वाहनधारक 15 वर्षानंतरही जुनी वाहने नोंदणी न करता वापरत आहेत आणि आरटीओकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नवीन नूतनीकरण शुल्कांनुसार, 20 वर्षांहून जुनी वाहने खालील प्रमाणे शुल्क आकारले जाईल:
दुचाकी वाहन: 2,000 रुपये
तीनचाकी वाहन: 5,000 रुपये
चारचाकी वाहन: 10,000रुपये
इतर वाहन: 12,000रुपये
या नवीन नियमांमुळे जुनी वाहने चालवणार्यांना आर्थिक दृष्ट्या तयारी ठेवावी लागणार आहे. पण, या सुधारामुळे वाहने कायदेशीरदृष्ट्या चालवणे शक्य होईल. वाहनधारकांसाठी ही एक संधी आहे. ज्यामुळे जुनी वाहने वापरली जाऊ शकतात तरी दुप्पट शुल्कामुळे खर्च थोडा जास्त होईल. यामुळे वाहनधारकांना आता नियोजनपूर्वक निर्णय घेणे गरजेचे ठरेल. कारण जुनी वाहने चालवण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.पण कायदेशीर दृष्टीने सुरक्षित राहणेही महत्त्वाचे ठरेल.