एकाकी झुंज आणि थरार
चोरटे दुकान फोडत असताना लालबहादूर बिस्टा तिथे पोहोचले. एकटे असताना आणि समोर पाच चोरटे असतानाही त्यांनी कोणतीही पर्वा न करता एकट्यानेच पाच चोरट्यांचा प्रतिकार केला. चोरट्यांनी त्यांना घाबरवण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी त्यांच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले. रखवालदाराच्या या प्रतिकारामुळे चोरट्यांना तिथून पळ काढावा लागला. तरीही त्यांनी काही चांदीचा ऐवजी लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
आठवड्यात तिसरी घटना
मोरगावमध्ये गेल्या आठवडाभरात चोरीचा हा तिसरा प्रयत्न आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून सुपा पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, इतकी मोठी घटना घडूनही सराफी व्यावसायिकांनी दुपारपर्यंत तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लालबहादूर बिस्टा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
निःशस्त्र असतानाही सशस्त्र चोरट्यांशी भिडणाऱ्या लालबहादूर बिस्टा यांच्या धैर्याचे संपूर्ण मोरगावमध्ये कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळेच मोठी चोरी होण्यापासून वाचल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
