TRENDING:

चंद्राचा कधीही न दिसणारा भाग, अचानक ब्लॅकआऊट अन् नासाचा संपर्क तुटला, 40 मिनिटांचा थरार, आर्टेमिस-2 मोहिमेत काय घडलं?

Last Updated:

Artemis 2 Mission: सूर्य, चंद्र आणि अंतराळयान एकाच रेषेत आल्याने अंतराळवीरांना एक वेगळ्या प्रकारचे ग्रहण पाहायला मिळाले, ज्यामुळे ‘ब्लॅक मून’सारखा अनुभव जाणवला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : तब्बल 54 वर्षांनंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पुन्हा एकदा मानवी अंतराळ मोहिमेसह चंद्राच्या दिशेने झेपावली आहे. आर्टेमिस-2 या मोहिमेद्वारे चार अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीच्या दिशेने परत येत आहेत. ही सुमारे 10 दिवसांची मोहीम असून अपोलो प्रोग्राम नंतर पाच दशकांनी अशा प्रकारची ऐतिहासिक मोहीम राबवली जात आहे. याबाबत पुण्यातील नासा स्पेस एज्युकेटर लीना बोकील यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली.
advertisement

या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अनुभवत त्यांनी चंद्राभोवती फेरी पूर्ण केली. विशेष म्हणजे, सूर्य, चंद्र आणि अंतराळयान एकाच रेषेत आल्याने अंतराळवीरांना एक वेगळ्या प्रकारचे ग्रहण पाहायला मिळाले, ज्यामुळे ‘ब्लॅक मून’सारखा अनुभव जाणवला. 40 मिनिटांसाठी या अंतराळवीरांचा नासासोबतचा संपर्क तुटला होता.

नासाचा पराक्रम, आर्टेमिस-2 चा नवा विक्रम; 54 वर्षांनी काय घडलं? पुणेकर आरुषने Video तून सांगितलं

advertisement

चंद्राच्या पाठीमागील भागाकडे जाण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या भागाचा सखोल अभ्यास करणे. चंद्राचा ‘फार साइड’ किंवा मागील भाग पृथ्वीवरून दिसत नाही. त्यामुळे त्या भागावरील खड्डे, पर्वत आणि भौगोलिक रचना यांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर उल्कापाताचे खुणा आणि अनोख्या रचना आढळतात.

View More

ब्लॅक मून म्हणजे प्रत्यक्षात चंद्र काळा होतो असे नाही. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या तुलनेत अशा स्थितीत येतो की त्यावर प्रकाश कमी पडतो किंवा तो पूर्णपणे दिसत नाही, तेव्हा त्याला ‘ब्लॅक मून’ असे संबोधले जाते. काही वेळा एका महिन्यातील दुसरा अमावस्या दिवस किंवा एखाद्या ऋतूमधील अतिरिक्त अमावस्या यालाही ‘ब्लॅक मून’ म्हणतात.

advertisement

या मोहिमेत अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 4 हजार मैल अंतरावरून प्रवास करत आहेत. या प्रवासादरम्यान ते विविध वैज्ञानिक निरीक्षणे करत असून चंद्राच्या भूगर्भीय वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जात आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चंद्राचा कधीही न दिसणारा भाग, अचानक ब्लॅकआऊट अन् नासाचा संपर्क तुटला, 40 मिनिटांचा थरार, आर्टेमिस-2 मोहिमेत काय घडलं?
सर्व पहा

नासा स्पेस एज्युकेटर लीना बोकील यांच्या माहितीनुसार, ही मोहीम भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः मानवाला पुन्हा चंद्रावर उतरवण्याच्या दृष्टीने ही मोहीम एक मोठा टप्पा मानला जात आहे. ही मोहीम 11 तारखेला पूर्ण होणार असून अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
चंद्राचा कधीही न दिसणारा भाग, अचानक ब्लॅकआऊट अन् नासाचा संपर्क तुटला, 40 मिनिटांचा थरार, आर्टेमिस-2 मोहिमेत काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल