Iran Legal Marriage Age : भारतात 18 वर्षांनंतरच लग्न, पण इराणमध्ये किती वयात होतो विवाह? काय आहेत नियम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तिथल्या मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो. आपल्याकडील कायद्यांच्या अगदी उलट परिस्थिती तिथे पाहायला मिळते.
मुंबई : आपल्या समाजात 'लग्नाचं वय' हा विषय नेहमीच चर्चेचा आणि संवेदनशील राहिला आहे. भारतात मुलीचं लग्नाचं कायदेशीर वय 18 वर्षे आहे आणि ते 21 करण्याबाबतही वारंवार चर्चा होत असते. सुशिक्षित समाजात तर आता करिअर आणि स्थैर्याला प्राधान्य देत मुलं-मुली 25-30 वयानंतरच लग्नाचा विचार करतात. पण, जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जिथे युद्धाच्या धगधगत्या ज्वाळांसोबतच तिथल्या अजब विवाह कायद्यांचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मिडल ईस्टमध्ये सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या युद्धाच्या बातम्या येत असतानाच लोकांचे लक्ष इराणमधील सामाजिक कायद्यांकडे वळले आहे. विशेषतः तिथल्या मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो. आपल्याकडील कायद्यांच्या अगदी उलट परिस्थिती तिथे पाहायला मिळते.
13 व्या वर्षीच होता येतं 'नवरी'
इराणच्या नागरी कायद्यातील (Civil Code) Article 1041 नुसार, तिथल्या मुलींच्या लग्नाचे अधिकृत कायदेशीर वय केवळ 13 वर्षे आहे. मुलांसाठी ही वयोमर्यादा 15 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. आपल्याकडे जिथे मुलींच्या शिक्षणाची ही सुरुवात असते, तिथे इराणमध्ये त्या कायदेशीररीत्या संसाराला सुरुवात करू शकतात.
advertisement
पण धक्कादायक बाब म्हणजे, ही केवळ सर्वसाधारण मर्यादा आहे. इराणच्या कायद्यात काही विशेष सवलतीही देण्यात आल्या आहेत:
जर मुलीच्या पालकांची (वडील किंवा आजोबा) संमती असेल आणि न्यायालयाने परवानगी दिली, तर 13 वर्षांपेक्षा कमी वयातही लग्न लावले जाऊ शकते.
इराणमधील काही कायद्यांनुसार, मुलींना 9 चंद्र वर्षांनंतर (साधारण 8 वर्षे आणि 9 महिने) कायदेशीररीत्या 'बालिग' मानले जाते. या आधारावर काही प्रकरणांमध्ये अत्यंत कमी वयात लग्नांना मंजुरी दिली जाते, ज्यामुळे तिथे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण होतो.
advertisement
वडिलांची किंवा आजोबांची परवानगी अनिवार्य
इराणमध्ये महिलांना त्यांच्या पहिल्या विवाहासाठी वयाची अट असली, तरी वडिलांची किंवा आजोबांची लेखी परवानगी घेणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. हे तिथल्या कौटुंबिक व्यवस्थेतील पुरुषांचे वर्चस्व दर्शवते. इतकेच नाही तर लग्नानंतर पासपोर्ट बनवणे किंवा परदेश प्रवास करणे यासाठीही पतीची परवानगी आवश्यक असते.
आकडेवारी काय सांगते?
अधिकृत आकडेवारीनुसार, इराणमध्ये दरवर्षी 15 वर्षांखालील हजारो मुलींचे विवाह होतात.
advertisement
सुमारे 17% मुलींचे लग्न त्या 18 वर्षांच्या होण्यापूर्वीच लावून दिले जाते.
सुमारे 3% मुलींचे लग्न वयाच्या 15 व्या वर्षापूर्वीच लागते.
बदलता समाज आणि वाढते वय
कायद्याने लग्नाचे वय कमी ठेवले असले, तरी इराणमधील शहरी भागात आता एक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. शिक्षण आणि वाढत्या सामाजिक जागरूकतेमुळे लग्नाचे सरासरी वय प्रत्यक्षात वाढले आहे. सध्या इराणमधील महिला सरासरी 25 व्या वर्षी लग्न करत आहेत. पुरुषांच्या बाबतीत हे वय 29 ते 30 वर्षांपर्यंत पोहोचले आहे.
advertisement
थोडक्यात काय इराणमधील कायदे आणि तिथली प्रत्यक्ष सामाजिक परिस्थिती यात मोठी तफावत आहे. जुन्या परंपरा आणि आधुनिक विचार यांच्या संघर्षात अडकलेल्या या देशातील महिलांचे हक्क आणि विवाहाचे कायदे आजही जागतिक स्तरावर चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 7:55 PM IST
मराठी बातम्या/देश/
Iran Legal Marriage Age : भारतात 18 वर्षांनंतरच लग्न, पण इराणमध्ये किती वयात होतो विवाह? काय आहेत नियम









