ऐतिहासिक शनिवारवाडा हा बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचा साक्षीदार आहे. पण मस्तानीला शेवटपर्यंत शनिवारवाड्यात प्रवेश मिळाला नाही. बाजीरावाने मस्तानीसाठी शनिवारवाड्याच्या बाजूलाच मस्तानी महाल बनविला होता पण हा महाल शनिवारवाड्यात लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्या जळालेल्या महालाचे काही अवशेष कोथरुड येथे ठेवण्यात आले होते, त्यातील काही आत्ता शिल्लक असून ते पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयात पहावयास मिळतात. आम्ही तुम्हाला त्याच महालाविषयी सांगणार आहोत.
advertisement
चिखल महोत्सवात जाण्यापूर्वी 'हे' लक्षात ठेवा अन्यथा होतील गंभीर परिणाम
इतिहासाची आठवण करून देणारा मस्तानी महाल
राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये पुनर्स्थापित मस्तानी महाल हा मूलतः थोरले बाजीराव पेशवे यांनी 1730 मध्ये 1734 दरम्यान पुण्यातील कर्वे रोड जवळ कोथरूड येथे मस्तानी साहेबांसाठी उभा केला. तेथून 1960 च्या दशकात संग्रहालयाचे संस्थापक काकासाहेब केळकर यांनी तेथून हा महाल शुक्रवार पेठमध्ये कुशल कारागिरांच्या साह्याने जसाच्या तसा उभा केला. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला आणि इतिहासाची आठवण करून देणारा हा मस्तानी महाल भेट देणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांसाठी निश्चितच आकर्षणाचे केंद्र बनला आहे, असं राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी सांगितले.
आगीत जळून नष्ट झाला होता महाल
मस्तानीचा आलिशान महाल हा एका भीषण आगीत जळून खाक झाला होता. त्याचे जळालेले अवशेष आजही आपल्याला केळकर संग्रहालयात पहायला मिळतात. महालात असलेले आरसे, बाजीरावांची शस्त्रे, वस्त्रे आणि महालाचे जळालेले अवशेष हे आजही बाजीराव मस्तानीच्या प्रेमाचे साक्षीदार आहेत, असंही सुधन्वा रानडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील 'हे' अख्खं गाव का आहे शाकाहारी? PHOTOS
कुठे आहे मस्तानी महाल?
कमलकुंज, बाजीराव रोड, नातू बाग, शुक्रवार पेठ, पुणे, महाराष्ट्र