अनिकेत हा वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी एका गंभीर आजारात सापडला. गिलन-बारे सिंड्रोम (Guillain–Barré Syndrome – GBS) या दुर्मीळ आजारामुळे त्याचा उजवा हाताचा पंजा पूर्णपणे निकामी झाला. अचानक उभ्या ठाकलेल्या या संकटाने अनिकेत आणि त्याचे कुटुंब संपूर्ण हादरले. काही महिन्यांपर्यंत तो कोमात होता आणि त्याचं जगणंही धोक्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांच्या उपचारांनी आणि कुटुंबाच्या अखंड प्रार्थनांनी तो हळूहळू सावरला.
advertisement
जन्म- मृत्यूच्या नोंदी लवकर करा, अन्यथा...; सरकारचा नवा नियम काय सांगतो?
आज अनिकेतला कृत्रिम हात बसवण्यात आला आहे. पण या कृत्रिम हाताचा वापर तो फक्त लिखाणापुरता करू शकतो. रोजच्या जगण्यातील साध्या गोष्टी, जड वस्तू उचलणे, नीट जेवण करणे, खेळांमध्ये भाग घेणे यासाठी त्याला अजूनही मर्यादा आहेत. ही अवस्था पाहून त्याच्या आई-वडिलांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वांच्या मनात काळजी आहे.
अनिकेतच्या आजीने सांगितले, माझ्या नातवाला खूप शिकायचं आहे. मोठं झाल्यावर त्याला पोलीस बनून गुन्हेगारांना शिक्षा द्यायची इच्छा व्यक्त करतो. आपल्या कुटुंबासाठी तो मेहनत घ्यायला तयार आहे. पण एक हात नसल्यामुळे त्याचं स्वप्न खरंच पूर्ण होईल का, ही आम्हाला फार चिंता आहे.
लहान मुलांना गोवर- रूबेलाचा धोका! डॉक्टर म्हणतात घाबरू नका; उल्हासनगमध्ये 'या' ठिकाणी मिळते मोफत लस
आज अनिकेतच्या संघर्षाने अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. त्याला समाजाकडून आधार आणि प्रोत्साहनाची गरज आहे. अशा परिस्थितीत समाजातील संवेदनशील लोक, स्वयंसेवी संस्था आणि शासनाने अशा मुलांच्या स्वप्नांना हातभार लावण्याची गरज आहे. कारण स्वप्नं पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मग तो अपंगत्व असो वा अन्य संकट.
अनिकेतची कहाणी आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वप्नांवर विश्वास ठेवून पुढे जाणं गरजेचं आहे. त्याची जिद्द, चिकाटी आणि आशावाद हे निश्चितच प्रेरणादायी आहेत. समाजाच्या मदतीने आणि त्याच्या स्वतःच्या आत्मविश्वासाने एक दिवस अनिकेतचं पोलीस बनण्याचं स्वप्न नक्कीच साकार होईल, अशीच सर्वांना आशा आहे.