पुण्यात रिक्षा अपघात प्रकरणामुळे गौतमी पाटीलवर मागील काही दिवसांपासून अनेक आरोप झाले. अखेरीस पुणे पोलिसांनी ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या मार्गावरील सगळे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये गौतमी पाटीलही कारमध्ये नसल्याचं सांगत पोलिसांनी तिला क्लिन चीट दिली. त्यानंतर एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना गौतमीने या सगळ्या प्रकरणावर आपली बाजू मांडली.
रिक्षाचालक मरगळे कुटुंबानेच मदत नाकारली'
advertisement
'मी कारमध्ये नव्हती, त्यावेळी घडलेल्या घटनेशी माझा संबंध काहीच नव्हता. घटना घडल्यानंतर मी मदतही पाठवली होती. माझा एक मानलेला भाऊ आहे, त्याला मी मदत घेऊन पाठवलं होतं. मी सुद्धा गरिबीतून आली आहे, मला या गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे जी मदत करता येईल ती केली. पण समोरून मला नकार आला. त्यांनी मदत घेण्यास नकार दिला, जे काही कायदेशीर आहे, त्यानुसार मदत घेऊ अशी त्यांची भूमिका होती. अपघात हा ५ वाजता झाला होता, त्यानंतर दुपारी मदत पोहोचवली होती. मरगळे कुटुंबीयांनी कायदेशीर चालायचं अशी भूमिका घेतली होती. मग ठीक आहे, मग मी शांत बसले. नंतर त्यांनी मला ट्रोल केलं. कुणीही काही बोलतं. काहीच अर्थ नाही. त्यांनी माझं नाव बदनाम केलं आहे. जिथे माझा संबंध नाही, तिथे माझं नाव जोडलं. मग कायदेशीर चाललं ते चालू द्या, मग मला असं म्हणायचं आहे.
पोलिसांनी काय विचारलं?
'पोलिसांनी मला जे सांगितलं, ते सगळं केलं, गाडीची कागदपत्र मागितली ती पुरवली आहे. ड्रायव्हरबद्दल माहिती पाहिजे होती ती दिली. मग आता जे चाललंय ते चाललंय.
गौतमी पाटील जखमी रिक्षाचालकाला का भेटायला गेली नाही?
'माझ्या तारखा आधीच घेतलेल्या असतात. त्या मी रद्द करू शकत नाही. समोरून अडव्हान्स पैसे घेतलेले असतात. समोरच्या लोकांचा खूप खर्च झालेला असतो, त्यामुळे मी शो रद्द करू शकत नाही. तरी जरी मी वेळ काढला. माझी भाऊ लोक तिथे मदत द्यायला पोहोचले होते. पण त्यांचा छान छान रिप्लाय येत होता. ते काय काय बोलले हे सगळ्यांसमोर आलं आहे. आता असा रिप्लाय आल्यावर मग मी कसं गेलं पाहिजे. मग तिथे जाऊन काय उपयोग झाला असता. ४ दिवस झाले, मला ट्रोल करण्यात आलं. मला ट्रोलिंग काही नवीन नाही. मी जशी व्हायरल झाली, तसं मला ट्रोल केलं जातंय, कोण मला चांगलं म्हणत नाही. मी चांगलं केलं तरी लोक मला वाईट म्हणतात. अन् जर काही वाईट केलं तर ते आहेच, त्याचा बोभाट आहेच. मला काय म्हणायचा, माझा संबंध येत नाही, मग माझं नाव तुम्ही का घेतात. अपघात हे दररोज होतात. आता हे व्हायला नको हवं होतं, माझ्यासाठीही शॉकिंग आहे. एवढं सगळं होतं, मग त्यावेळी का नाही, असा सवालही गौतमीने उपस्थितीत केला.
ड्रायव्हर गाडी कधी घेऊन गेला?
'ड्रायव्हर मला तो दुपारी बोलला गाडी घेऊन जाऊ का, त्याला कुठे देवदर्शनाला जायचं होतं. माझा एक फोन झाला, त्यानंतर तो कुठे गेला मला माहिती नाही. मी माझ्या कामात होती. नंतर मला या गोष्टी कळल्या. ड्रायव्हरसोबत माझं काही बोलणं झालं नाही. पोलिसांनी सगळं तपासलं आहे. पोलीसदादांनी बाईट दिला आहे. आता काय लिगल आहे, ते पोलीस पाहतील.
कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विधानावर गौतमी काय म्हणाली?
प्रत्येकाला वाईट वाटणारच, आाता उचलायचं म्हणजे काय, मला फक्त एकच म्हणायचं, चंद्रकांत पाटील दादा यांना काही म्हणायचं नाही. जो तो आपल्या परीने बोलत असतो. मला काही बोलायचं नाही. माझा संबंध काही येत नाही. गाडी माझी आहे हे मला मान्य आहे. पण, कोण म्हणत मी गाडीत आहे. गाडीत नाहीये. आता बघा म्हटलं तर पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तो ड्रायव्हर जिथे जिथे फिरला, तिथे पोलिसांनी तपासलं आहे.
मी खूप रडले
बरं ठीक आहे, पण तुम्ही एखाद्याला इतकं का ट्रोल करताय. एवढं का बोलू शकता. एखाद्याला किती ट्रोल करतात. या प्रकरणामुळे मी खूप रडले, मला खूप त्रास झाला. किती एखाद्याला त्रास देताय. मी पहिल्यापासून ट्रोल झाली आहे. ठीक आहे ना, पण असं नाहीये ना, माझ्याकडे पण पाहा ना. मी गाडीतच नव्हती तर मला का दोष देताय.
