समोर आलेल्या माहितीनुसार, तरूणी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती. तरूणी दुचाकी चालवत होती. पुनावडे रोडवरील लाइफ रिपब्लिक सोसायटी समोरून जात असताना भरधाव डंपर ट्रकने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरूणी आणि वडील रस्त्यावर पडले.तरूणी थेट डंपरच्या खाली आली आणि चाकाखाली चिरडली गेली. या अपघातात तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय वर्ष २०) या निष्पाप तरूणीचा दुर्देवी मृत्यू झाला.
advertisement
आरोपीला हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दरम्यान हा अपघात झाल्यानंतर डंपर चालक हा फरार झाला होता. मात्र सायंकाळच्या सुमारास फरार आरोपी अजय ढाकणे याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . या अपघातानंतर आता हिंजवडी पोलिसांना जाग आली असून पोलिसांकडून डंपर असेल किंवा रेडमी मिक्स वाहनांवर कडक कारवाई सुरू केल्याचे दिसत आहे. मात्र वारंवार होणाऱ्या या अपघातांच्या मालिकेला हिंजवडीतील रस्ते वाहतूक कोंडी आणि कोणतेही निर्बंध नसलेले जड वाहनाच्या वाहतुकीला नेमकं कोण जबादार आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान गेल्या 11 महिन्यांत या RMC ट्रक मुळे अपघात आतापर्यंत 7 महिलांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत किती अपघात झाले?
- 24 जानेवारी 2025
- 12 ऑगस्ट 2025
- 23 सप्टेंबर 2025
- 10 ऑक्टोबर 2025 रोजी
- 17 नोव्हेंबर 2025 रोजी
-प्रांजल यादव आणि आश्लेषा गावंडे यांचा अंगावर थेट सिमेंट मिक्सर कलंडला
-प्रत्युषा बोराटे या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू देखील सिमेंट मिक्सर च्या चाकाखाली येऊन झाला
-राजेश्वरी चंद्रशेखरन अय्यर या 65 वर्षीय महिलेचा सिमेंट मिक्सरने भीषण धडकेत मृत्यू.
-भारती मिश्रा यांचा सिमेंट मिक्सर च्या चाकाखाली येऊन मृत्यू
-20 वर्षीय तन्वी साखरे हिचा डंपर खाली येत जागीच मृत्यू
