पुण्याजवळच्या चिंचवड गा दैवशील जाधव या मराठी माणसानं इंदवटी हे अस्सल कोकणी पदार्थ देणारे हॉटेल सुरु केलंय. या हॉटेलात गावच्या खास कोकणी मसाल्यांची रेसीपी त्यांनी वापरली आहे.
घरच्या घरी करा कसे तयार करायचे अस्सल मालवणी पद्धतीचे कोंबडी वडे, Recipe Video
इथं मिळणाऱ्या माशांच्या विविध डीशमध्ये प्रामुख्याने ओल्या नारळाचा वापर केला जातो. कोकण किनारपट्टीवर मिळणारे पापलेट, सुरमई, कोळंबी, बोंबील , बांगडा या माशांना खवय्यांकडुन सर्वाधिक पसंती मिळत असते. त्यामुळेच याठिकाणी भरलेले पापलेट, तवा पापलेट, रस्सेदार पापलेट, सुरमईचं तिखलं, तवा सुरमई, कोळंबी, मांदेली आणि बोंबील, बांगडा फ्राय आदी पदार्थाची मेन्यु कार्डमधली नावे वाचतानाच तोंडाला पाणी सुटु लागते.
advertisement
मासेच नव्हे तर चिकन आणि मटनाचे कोंबडी वडे, मटण भाकरी , कोंबडी वडे असे विविध प्रकार येथे मिळतात. चिकन आणि मटणासाठी मात्र ओल्या नारळा ऐवजी सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो. शाकाहारींची देखील काळजी, घेण्यात येते असं जाधव यांनी सांगितलं.
मधुराने सांगितली झणझणीत अन् टेस्टी वाटणाची सिक्रेट रेसिपी; 15 दिवस टिकेल, अन् व्हा टेन्शन फ्री
डाळिंबी उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ, वांग्याचे भरीत, मसाले भात इतकेच नव्हे तर कोकणात खास प्रसिद्ध असलेले आंबोळी आणि घावन हे तांदळापासून तयार करण्यात येत असलेले विशिष्ट पदार्थही याठिकाणी उपलब्ध आहेत. जेवणाची रुची वाढविण्यासाठी कोथंबीर वडी ,अळूवडी देखील या ठिकाणी मिळते , अशी माहिती दैवशील जाधव यांनी दिली. एवढे चमचमीत पदार्थ खाऊन झाल्यानंतर ते पचवणेही तितकेच महत्त्वाचे. यासाठी खास कोकणची ओळख असलेली इथे मिळणारी आमसुलाची सोलकढी तर आवर्जुन घ्यायलाच हवी, असं आवाहन जाधव यांनी केलंय.
पिंपरी चिंचवड मधील चिंचवड गावात एका दैवशील जाधव या मराठी व कोकणी माणसाने इंद्रावटी या हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली. कोणतेही हॉटेल यशस्वी ठरते ते म्हणजे त्यातील.
कुठे आहे?
चिंचवड गावातील एल्प्रो मॉलच्या उजवीकडे आरटीओ ऑफिस आहे त्या ठिकाणच्या तळघरात इंदावटी हॉटेल आहे .