घरच्या घरी करा कसे तयार करायचे अस्सल मालवणी पद्धतीचे कोंबडी वडे, Recipe Video

Last Updated:

कोकणाची शान असलेले कोंबडी वडे घरी कसे करावेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

+
News18

News18

पुणे, 11 ऑगस्ट : कोंबडी वडा हा कोकणी पदार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. विशेषत: मटन किंवा चिकन सोबत खाण्यासाठी हे वडे केले जातात. कोंबडीचा रस्सा आणि वडे ही डिश देखील चांगलीच फेमस आहे. त्याचबरोबर मटणाचा रस्सा किंवा काळ्या वाटाण्याच्या रस्स्यासोबतही हे वडे खाल्ले जातात. कोकणाची शान असलेले कोंबडी वडे घरी कसे करावेत  हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पुण्यातल्या मधुरा जाधव यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
पूर्वतयारी (वड्यासाठी पीठ बनवणे)
साहित्य :  जाडा तांदूळ - 1 किलो, चणा डाळ - 100 ग्रॅम, उडीद डाळ - 50 ग्रॅम, धणे - 1 चमचा, बडीशेप - 1 चमचा, मेथीचे दाणे - अर्धा चमचा
कृती : तांदूळ स्वच्छ धुवा. निथळून सुती कापडावर वाळवा. तांदूळ धुतल्यानं वडे मऊ होतात. पावसामुळे किंवा घाई असेल तर तांदूळ धुतले नाहीतर तरी चालेल.  डाळ आणि इतर पदार्थ धुण्याची गरज नाही. हे सर्व पदार्थ एकत्र करुन गिरणीतून भरड दळून घ्यावं. पीठ हवाबंद डब्यात ठेवावे. हे वडे करायचे असतील तेव्हाच पीठ दळून घ्यावे. ताज्या पिठाचे वडे चांगले लागतात, असा सल्ला जाधव यांनी दिलाय.
advertisement
सर्व पीठ तसंच धने पूड हे साहित्य बाजारात उपलब्ध असतात. ते सर्व एकत्र करून वापरता येतील. 2 कप तांदळाचे पीठ, अर्धा कप बेसन आणि 6 उडदाचे पापड भिजवून कुस्करून पीठ भिजवता येईल. उडदाची डाळ, मेथी दाणे, बडीशेप हे किमान 2 तास भिजवावेत, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
कोंबडी वड्याचे साहित्य : वड्याचं पीठ, 1 मोठा कांदा, 2 - 3 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, आलं, 5-6 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ
कोंबडी वड्याची कृती :  कांदा, मिरची, आल, लसूण, मिरची हे सगळ वाटून घ्या. (काही जण आलं किंवा मिरची  वापरत नाहीत पण कांदा जरूर घालावा.) एका परातीत पीठ, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून चपातीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळून घ्या. रात्रभर उबदार जागेत झाकून ठेवा.सकाळी पीठ फुगून येईल.
advertisement
छान मऊ झालेलं असेल.एक भिजलेला सुती कपड्याचा तुकडा पोळपाटावर किव्हा प्लास्टिक पिशवीवर पसरून लिंबाएवढ्या आकाराचे पीठाचे गोळे करून वडे थापून घ्या. तेल गरम करून मध्यम आचेवर वडे व्यवस्थित तळून घ्या. वडे छान फुगतात.मग वाट कसली पाहताय !हे गरमागरम वडे गरम झणझणीत मटणाच्या किव्हा चिकनच्या रश्यासोबत वाढा,' अशी माहिती जाधव यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
घरच्या घरी करा कसे तयार करायचे अस्सल मालवणी पद्धतीचे कोंबडी वडे, Recipe Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement