advertisement

वयाच्या ६० व्या वर्षी नवीन घर खरेदीसाठी कर्ज मिळते का? नियम-अटी काय आहेत?

Last Updated:

मुंबई : वयाची साठ वर्षे पूर्ण झाली की बँका होम लोन देत नाहीत, अशी एक ठाम समजूत अनेकांच्या मनात आहे. मात्र प्रत्यक्षात ही धारणा पूर्णपणे चुकीची ठरते. ज्येष्ठ नागरिकांनाही बँकांकडून गृहकर्ज मिळू शकते, पण त्यासाठी काही अतिरिक्त अटी, कडक निकष आणि आर्थिक तपासणीला सामोरे जावे लागते. वाढत्या घरांच्या किमती पाहता, निवृत्तीनंतरही अनेक जण स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करतात आणि अशा वेळी होम लोन हा महत्त्वाचा पर्याय ठरतो.

Property rules
Property rules
मुंबई : वयाची साठ वर्षे पूर्ण झाली की बँका होम लोन देत नाहीत, अशी एक ठाम समजूत अनेकांच्या मनात आहे. मात्र प्रत्यक्षात ही धारणा पूर्णपणे चुकीची ठरते. ज्येष्ठ नागरिकांनाही बँकांकडून गृहकर्ज मिळू शकते, पण त्यासाठी काही अतिरिक्त अटी, कडक निकष आणि आर्थिक तपासणीला सामोरे जावे लागते. वाढत्या घरांच्या किमती पाहता, निवृत्तीनंतरही अनेक जण स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करतात आणि अशा वेळी होम लोन हा महत्त्वाचा पर्याय ठरतो.
वय नाही, तर आर्थिक क्षमता निर्णायक
बँकांच्या दृष्टीने केवळ वय महत्त्वाचे नसून कर्जदाराची आर्थिक क्षमता अधिक महत्त्वाची असते. तुम्ही निवृत्त असलात तरी तुमच्याकडे नियमित आणि विश्वासार्ह उत्पन्नाचा स्रोत असल्यास होम लोन मिळू शकते. पेन्शन, घरभाडे, मुदत ठेवीवरील व्याज, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमधील उत्पन्न, तसेच व्यवसायातून येणारी कमाई या सर्व गोष्टी बँका विचारात घेतात. मुख्य प्रश्न एवढाच असतो की, तुम्ही दरमहा ईएमआय वेळेवर भरू शकता की नाही.
advertisement
पेन्शनधारकांना तुलनेने दिलासा
सरकारी किंवा निमसरकारी पेन्शनधारकांसाठी गृहकर्जाची प्रक्रिया तुलनेने सोपी असते. कारण त्यांचे उत्पन्न निश्चित आणि दीर्घकालीन असते. खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांनाही पेन्शन किंवा इतर गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळत असल्यास कर्ज मिळण्याची शक्यता असते. मात्र उत्पन्नाचे स्रोत जास्त असतील किंवा स्वयंरोजगारातून कमाई होत असेल, तर बँका अधिक कागदपत्रांची मागणी करू शकतात.
advertisement
निवृत्तीनंतरही नोकरी असल्यास फायदा
जर तुम्ही साठ वर्षांनंतरही नोकरी करत असाल, तर तुमची निवृत्तीची अधिकृत वयोमर्यादा बँकांसाठी महत्त्वाची ठरते. त्याच आधारे कर्जाचा कालावधी निश्चित केला जातो. काही प्रकरणांत सहकर्जदार (को-अप्लिकंट) म्हणून मुलगा किंवा मुलगी जोडल्यास कर्ज मिळण्याची शक्यता वाढते आणि कालावधीही थोडा वाढू शकतो.
कर्जाचा कालावधी आणि ईएमआयचा ताण
ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे गृहकर्जाचा कालावधी. बहुतांश बँका अशी अट घालतात की होम लोन ७०, ७५ किंवा जास्तीत जास्त ८० वर्षांपर्यंत पूर्ण फेडले गेले पाहिजे. त्यामुळे वय जसे वाढते, तसे कर्ज फेडण्यासाठी उपलब्ध कालावधी कमी होतो. याचा थेट परिणाम ईएमआयवर होतो आणि मासिक हप्ता तुलनेने जास्त ठरतो. काही ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आर्थिक भार जड ठरू शकतो.
advertisement
क्रेडिट स्कोर ठरतो निर्णायक
६० किंवा ६५ वर्षांच्या वयात क्रेडिट स्कोरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ७५० किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोर असल्यास कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. पूर्वी कर्जफेडीत विलंब, थकबाकी किंवा डिफॉल्ट झालेला असेल, तर बँका कर्ज देताना अधिक सावध राहतात किंवा जास्त व्याजदर आकारतात. त्यामुळे गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी स्वतःचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे गरजेचे ठरते.
advertisement
नियोजन केल्यास गृहस्वप्न शक्य
एकूणच, साठीनंतरही योग्य आर्थिक नियोजन, स्थिर उत्पन्न आणि चांगला क्रेडिट स्कोर असल्यास गृहकर्ज मिळू शकते. अटी कडक असल्या तरी योग्य तयारी आणि सल्ल्याच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकही स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात, हेच वास्तव आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वयाच्या ६० व्या वर्षी नवीन घर खरेदीसाठी कर्ज मिळते का? नियम-अटी काय आहेत?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement