advertisement

MPSC ची तयारी करणारा मंगेश शिवनेरी गडावर गेला अन् परतलाच नाही, 700 फूट खोल दरीत आढळला मृतदेह

Last Updated:

शिरूर इथं राहणारा मंगेश सोनवणे हा दोन दिवसांपूर्वी शिवनेरी गडावर फिरण्यासाठी आला होता. दिवसभर गडावर फिरला. त्यानंतर गडाच्या सनसेट पॉईंटजवळील

News18
News18
सचिन तोडकर, प्रतिनिधी
जुन्नर: जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले शिवनेरी गडावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गडावर फिरायला आलेल्या एका तरुणाचा मृतदेह अंबरखानाच्या पाठीमागील 700 फूट खोल दरीत आढळला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  किल्ले शिवनेरी गडाच्या सनसेट पॉईंटजवळील कड्यावरून सुमारे ७०० फूट खोल दरीत हा मृतदेह आढळून आला होता. मृत तरुणाची ओळख शिरूर येथील रहिवासी मंगेश सोनवणे (वय २५, मूळ राहणार, ढवळपुरी, अहमदनगर; सध्या रा. शिरूर)  अशी झाली आहे. मंगेश हा एमपीएससी परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मंगेश हा दोन दिवसांपूर्वी शिवनेरी गडावर फिरण्यासाठी आला होता. गडावर त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
advertisement
नेमकं काय घडलं? 
शिरूर इथं राहणारा मंगेश सोनवणे हा दोन दिवसांपूर्वी शिवनेरी गडावर फिरण्यासाठी आला होता. दिवसभर गडावर फिरला. त्यानंतर गडाच्या सनसेट पॉईंटजवळील कड्यावरून सुमारे ७०० फूट खोल दरीत उडी मारली. मंगळवारी सकाळी ८ वाजता मंगेशचा मृतदेह गडाच्या अंबरखानाच्या पाठीमागे असलेल्या खोल दरीत स्थानिक गावकऱ्यांना आढळून आला. त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांनाा दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर सकाळी ८.४० वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आलं.
advertisement
700 फूट दरीतून काढला मृतदेह
घटनास्थळी वन विभाग, पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे रेस्क्यू मोहिम सुरू केली. ७०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्याची मोहिम ही धोकादायक अशीच होती.  वन विभागाचे कर्मचारी नितीन विधाटे आणि पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे, जुन्नर पोलीस स्टेशनचे हवालदार महेश भालेराव, समाधान ताडगे आणि बापू वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहिम राबवण्यात आली. यावेळी शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमची मदत घेण्यात आली. शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी ७०० फूट खोल दरीत उतरून दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढला.
advertisement
मंगेश सोनवणेनं का उचललं टोकाचं पाऊल?
मंगेश सोनवणे हाा शिरूर तालुक्यात राहणारा तरुणा होता. अलीकडेच तो एमपीएएससीची तयारी करत होता. दोन दिवसांपूर्वी तो गडावर आला. त्यानंतर तो खाली आलाच नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मंगेशने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला आहे. मंगेशचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंगेशनं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल सांगितलं जाईल. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
MPSC ची तयारी करणारा मंगेश शिवनेरी गडावर गेला अन् परतलाच नाही, 700 फूट खोल दरीत आढळला मृतदेह
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement