हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव अजय पंडित (वय 23) आहे. अजय पंडित हादेखील मूळचा झारखंडचा असून कात्रजच्या खोपडेनगर भागात राहत होता. अजय पंडित आणि अशोक पंडित हे चुलत भाऊ आहेत. मागच्या 4 वर्षांपासून दोघेही पुण्यात मजुरीचं काम करतात. अजय पंडित हा बेपत्ता झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला करण्यात आली होती.
advertisement
अजय हरवल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. तांत्रिक मुद्दे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना अजयचा चुलत भाऊ अशोक पंडित याच्यावर संशय आला, त्यामुळे पोलिसांनी अशोकला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान अशोकने उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर अशोकने आपणच अजयची हत्या केल्याची कबुली दिली.
चाकूने वार करून आपण अजयचा मृतदेह कात्रज घाटातील गुजरवाडी भागात फेकल्याची माहिती अशोकने पोलिसांना दिली. अशोकच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसराची झाडाझडती घ्यायला सुरूवात केली, तेव्हा त्यांना अजयचा मृतदेह आढळला.
पत्नीसोबत अफेयरचा संशय
अशोकला त्याच्या पत्नीच्या चॅटमध्ये अजयसोबतचे काही मेसेज सापडले, यावरून पत्नीचं आपल्या चुलत भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय अशोकला आला. हे मेसेज पाहून अशोक संतापला आणि त्याने अजयचा शोध घ्यायला सुरूवात केली. अशोक आपल्याला शोधत आहे, हे समजल्यानंतर अजय कन्स्ट्रक्शन साईटवरून फरार झाला आणि दोन ते तीन दिवस लपून राहिला, पण संतापलेल्या अशोकने त्याचा शोध सुरूच ठेवला.
बराच शोध घेतल्यानंतर अखेर अशोकला अजय दुसऱ्या कन्स्ट्रक्शन साईटवर लपून बसला आहे, अशी माहिती मिळाली. अजयचा काटा काढण्यासाठी अशोक रात्रीच्या अंधाराची वाट पाहत होता, यानंतर एक दिवस अशोक साईटवर गेला आणि अजयवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अजयचा जागीच मृत्यू झाला, यानंतर अशोकने अजयचा मृतदेह कात्रजच्या घाटात फेकून दिला.
