TRENDING:

'मला नोकरीची गरज नाही,10-20 लाख असे टाकेन' सरकारी अधिकाऱ्याला बडबड भोवली, VIDEO

Last Updated:

"एक गोष्ट लक्षात घ्या, मी खानदानी आहे, पैशाने मोठा आहे. पैसापाणी भरपूर आहे. द्यायचं ठरलं ना तर १० , २० लाख रूपये टाकून मोकळा होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मधुकर गलांडे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

इंदापूर: 'मला नोकरीची गरज नाही, साडे सतरा एकर ऊस आहे, साडे सतरा केळी आहे. मी खानदारी माणूस आहे, बापाला माझ्या पावणे दोन लाख पेन्शन येतेय. जर मनात आलं ना 10-20 लाख रुपये टाकून असा मोकळा होतो' ही वाक्य आहे एका शासकीय कर्मचाऱ्याचे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालयात या अधिकाऱ्यांची मुजोरी कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला होता. अखेरीस हा अधिकारी निलंबित झाला आहे.

advertisement

इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातला हा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला होता. सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी असं या मुजोर अधिकाऱ्याचं नाव आहे. या बडबड करणाऱ्या कुलकर्णीला निलंबित करण्यात आलं आहे. इंदापूर तालुक्यात राहणाऱ्या तक्रारदार   संतोष महादेव रकटे  यांनी शेटफळगडे येथील गट नंबर २५२ मो.र.नं. ५८१७/२०२१ याा प्रकरणाची संपूर्ण केल नक्कल मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांनी ३ वेळा भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला. पण, चक्करा मारूनही काही काम होईना. रकटे यांनी याबद्दल उपअधीक्षकांकडे आपली व्यथा मांडली. त्यांनी मुख्यालय सहाय्यक विवेकानंदर कुलकर्णी यांच्याकडे पाठवलं. आता वरिष्ठांकडे आदेश आल्यामुळे कुलकर्णींना भलताच राग आला.

advertisement

जेव्हा रकटे हे कार्यालयात पोहोचले तेव्हा कुलकर्णी यांनी आपण किती श्रीमंत आहोत, याचा पाढा वाचून अरेरावी केली.  "डायरेक्ट साहेबांना भेटला म्हणजे काम होत नाही, साहेबांना कुठे पाठवलं, किंवा इतर कुणाला पाठवलं, मी कुणाला घाबरत नाही. मला नोकरीची गरज नाही, साडे सतरा एकर ऊस आहे, साडे सतरा केळी आहे. मी खानदारी माणूस आहे, बापाला माझ्या पावणे दोन लाख पेन्शन येतेय' असं म्हणत कुलकर्णींना आपली बडबड सुरूच ठेवली.

advertisement

तसंच, "मी घाबरत नाही, ऑफिस बिफिस गेलं तिकडे, प्रेमात काम केलं तर कपडे सुद्धा काढून देईन. प्रेमात सगळी काम होतात. हे सगळं ऑफिस माझ्यामागे लागलं आहे. मला इथून काढण्यासाठी. मी लोकांची चांगलं काम करतो म्हणून. माझ्या मागे बाया सोडल्या, गडी सोडले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो' असंही हे महाशय म्हणाले.

advertisement

"एक गोष्ट लक्षात घ्या, मी खानदानी आहे, पैशाने मोठा आहे. पैसापाणी भरपूर आहे. द्यायचं ठरलं ना तर १० , २० लाख रूपये टाकून मोकळा होईल. घाबरलो असं समजू नका, ७५ एकर बागायती जमीन उजनीच्या कडेला आहे. शासकीय काम करतो, तुम्हाला वाटतं पगारासाठी करतोय, अर्रर्र असं समजू नका, मी हौस म्हणून काम करतो. काम करायचं म्हणून काम करतो. माझा बाप इतका मोठा आहे ना, पावणे दोन लाख रूपये पेन्शन आहे' असंही कुलकर्णींनी तरटे यांना सांगितलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंतीला भाग्य उजळणार, 6 राशींवर बाप्पाची कृपा होणार!
सर्व पहा

साहेबांना कॉन्टॅक्ट केला म्हणजे आम्ही घाबरत नाही. माझ्या विरोधात काय करायचं ते करा, अशा धमकीवजा वक्तव्यांमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या संपूर्ण प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाची पद्धत, अधिकाऱ्यांची भाषा आणि सामान्य नागरिकांशी होणारी वागणूक यावर तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. अखेरीस या कुलकर्णी साहेबांवर आता निलंबनाची कारवाई केली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
'मला नोकरीची गरज नाही,10-20 लाख असे टाकेन' सरकारी अधिकाऱ्याला बडबड भोवली, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल