नेमकी घटना काय?
अमोल बबन बच्चे (वय ३३) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (२ फेब्रुवारी) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. अमोल यांचे वडील त्यांच्या आईला काही कारणास्तव शिवीगाळ करत होते. मात्र, आरोपी लहू बच्चे, पपेश बच्चे, भरत बच्चे आणि प्रदीप बच्चे यांना असा गैरसमज झाला की, अमोल यांचे वडील आपल्याला उद्देशून शिवीगाळ करत आहेत.
advertisement
पुणे हादरलं! तरुणीसाठी दोन मित्रांमध्ये वाद, चेतननं कोयता काढला अन् भरचौकात हादरवणारं पाऊल
गैरसमजातून रक्तरंजित राडा
याच रागातून आरोपींनी अमोल यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड काढून अमोल यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अमोल गंभीर जखमी झाले असून आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी लहू बच्चे, पपेश बच्चे, भरत बच्चे आणि प्रदीप बच्चे यांच्या विरोधात मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागातील कौटुंबिक वादातून झालेल्या या राड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
