TRENDING:

Pune: 'कबुतरासाठी बैठका, 56 जणांचा जीव घेणाऱ्या बिबट्यासाठी सरकारकडे वेळ नाही' 12 तासांनंतरही मंचरकर आंदोलनावर ठाम

Last Updated:

शिरुर आणि जुन्नर हा उसपट्टा आहे. त्यामुळं या भागात बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातूनच बिबट्या आणि मानव संघर्ष वारंवार होतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन तोडकर, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे :  पुण्यातील ग्रामीण भागात मागील काही वर्षांपासून बिबट्याने केलेल्या हल्ल्यांमुळे अखेरीस लोकांचा संयम सुटला आहे. पुण्यातील शिरुर भागात नरभक्ष्यक बिबट्याने  गेल्या २० दिवसात हल्ले करून ३ जणांचा जीव घेतला.  डोळ्या देखत लेकरांना ओढून नेणाऱ्या बिबट्याची प्रचंड दहशत या परिसरात आहेत. आम्हाला वाचवा म्हणत पिंपरखेडच्या गावकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.  पुणे जिल्ह्यातील वाढत्या बिबट समस्येच्या विरोधात गेल्या १२ तासांपासून मंचर येथे सुरू असलेले पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन अद्यापही मिटलेलं नाही. आंदोलकांनी याठिकाणी आता चक्क पुणे नाशिक महामार्गावरच जेवणाच्या पंगती धरलेल्या पाहायला मिळत आहेत. 

advertisement

12 ऑक्टोबर 2025 - शिवण्या बोंबे या साडे पाच वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर 22 ऑक्टोबर 2025 - भागुबाई जाधव या महिलेचा बिबट्यानं जीव घेतला. 2 नोव्हेंबर 2025 रोहन बोंबे या 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. 20 दिवसांत तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.

शिरुर आणि जुन्नर हा उसपट्टा आहे. त्यामुळं या भागात बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातूनच बिबट्या आणि मानव संघर्ष वारंवार होतोय. बिबट्याच्या माणसांवरील वाढत्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्या आणि मानव संघर्ष या भागात नवा नाही. शिकारीच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत येतात. भटकी कुत्री आणि गोठ्यातील जनावरं बिबट्यांची शिकार बनतात. पण माणसांवरील हल्ल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

advertisement

पुणे नाशिक महामार्गावर १२ तास ठिय्या

त्यामुळे, पुणे नाशिक महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं हत्यार उपसलं.  सोमवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून मंचर मधील नंदी चौकात आंदोलन सुरू झालं ते रात्रीपर्यंत सुरू होतं. पुणे-नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन अद्यापही मिटलेले नाही. आंदोलकांनी याठिकाणी आता चक्क पुणे नाशिक महामार्गावरच जेवणाच्या पंगती बसल्या. वनविभागाच्या वतीने मुख्य वन संरक्षक आकाश ठाकरे यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यात आल्यात, आंदोलकांच्या मांगण्यांना लेखी उत्तर देण्याचेही मान्य करण्यात आलंय. तरीपण जोपर्यंत वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री भेट देत नाहीत तो पर्यंत आंदोलन न मिटविण्याचा मागणीवर आंदोलक ठाम आहेत.

advertisement

कबुतरासाठी बैठक होते, पण बिबट्यासाठी सरकारकडे वेळ नाही!

दरम्यान, जुन्नर वनपरिक्षेत्रात १२०० हुन अधिक बिबट असल्याची माहिती शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी यांनी दिली. यावेळी कोल्हे यांनी आंदोलनस्थळावरुन फोनवर वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संवाद साधला. स्वतः वनमंत्री यांनी इथं येऊन पाहणी करावी येथे एकूण 56 बळी बिबट्याच्या हल्ल्यात झाल्यात. नागरिकांची परीक्षा पाहिली जाते का?  मुख्यमंत्र्यांना कबुतरासाठी बैठक घेता येते मात्र बिबट्यासाठी बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ नाही. ज्या बालकाचा मृत्यू झाला त्याच्या नातेवाईंनी अंत्यसंस्कार करणार नसल्यावर ठाम आहे. सरकार आमचा अंत पाहणार असेल तर अजून आंदोलन तीव्र करावं लागेल, असा इशारा यावेळी कोल्हेंनी दिला.

advertisement

पालकमंत्री म्हणून अजित दादानी लक्ष घातले पाहिजे.  नरभक्षण बिबट्याला शूट केले पाहिजे आणि बिबट्याची नसबंदी केली पाहिजे नसबंदी बरोबर राज्य आपत्ती घोषित करण्यात यावी. तरच उपाययोजना होईल. दुर्दैवाने, अधिकारी यांनी वनमंत्र्यांना माहिती देत नाही म्हणून वनमंत्र्यांनी सांगितलं की, जुन्नरचे बिबटे आमच्या जिल्ह्यात सोडले आहे. वनमंत्र्यांनी इथं यावे ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घ्यावं जेणेकरून त्यांचे अधिकारी त्यांना जे काही माहिती देतात त्याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती त्यांना समजेल, अशी मागणीही त्यांनी केली.

'वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन करावं लागेल'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

'ग्रामस्थांचा रोष कमी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. प्राणीमित्र काहीतरी सूर लावतील. मात्र बिबट्या ची संख्या मोठी आहे. ती कमी होणारी नाही. एक मादी चार पिल्लांना जन्म देते त्यामुळे बिबट्याची संख्या वाढत आहे. कुत्र्यांपेक्षा बिबट्यांची संख्या जास्त झाली आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही खांद्यावर खेळवल्याला बिबट्या आता आमच्या जीवावर उठला. वेळ प्रसंगी आम्हाला वर्षा बंगल्यावर आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कोल्हेंनी दिला.

मराठी बातम्या/पुणे/
Pune: 'कबुतरासाठी बैठका, 56 जणांचा जीव घेणाऱ्या बिबट्यासाठी सरकारकडे वेळ नाही' 12 तासांनंतरही मंचरकर आंदोलनावर ठाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल