पुणे – नागपूर आणि कोल्हापूर – नागपूर या दोन्ही गाड्या पुणे रेल्वे विभागातून दररोज धावतात. पुण्यातून विदर्भात जाणारी दैनंदिन प्रवासी संख्या मोठी असून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक प्रवासी नाइलाजाने खासगी बसमधून प्रवास करतात. पुणे ते नागपूरदरम्यान ट्रेनचे तिकीट जनरल 160, स्लीपर 380 रुपये आहे. तर खासगी ट्रॅव्हल्सला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. अनेक वेळा रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दोन्ही गाड्यांना जनरल डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत होती.
advertisement
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे गाड्यांचे डबे वाढवम्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यामुळे पुणे – नागपूर आणि कोल्हापूर – नागपूर या दोन्ही गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय घेतला असून याचा फायदा प्रवाशांना होईल, असे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहेरा यांनी सांगितले.
रेल्वेचा प्रवास स्वस्तात होणार
पुणे आणि परिसरातून विदर्भ आणि खान्देशात जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अनेकदा रेल्वे तिकीट न मिळाल्याने या प्रवाशांना खासगी बसने दीड ते दोन हजार रुपये मोजून प्रवास करावा लागतो. मात्र, रेल्वेने डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून दररोज 600 प्रवाशांची सोय होणार आहे. विशेष म्हणजे केवळ 160 रुपयांत त्यांचा प्रवास होईल.