पुण्यातील विविध पब, क्लब आणि रेस्टॉरंट्समध्ये झालेल्या फ्रेशर्स पार्टींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सक्रिय आंदोलन केले होते. शहरातील बदलती पार्टी संस्कृती धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे या आंदोलनात सांगितले गेले. पुण्यात सर्रास चालू असलेल्या अशा पार्टींमुळेच पोर्शे प्रकरणासारख्या अपघातांची उकल झाली होती. दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाने पब्जच्या नियमात अधिक काटेकोरपणा आणावा, अशी मागणी मनसेने केली होती.
advertisement
मनसेच्या प्रतिनिधींनी पोलिस आयुक्तांना भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्र संघटक प्रशांत कनोजिया, राज्य सचिव आशिष साबळे, उपाध्यक्ष सचिन पवार, कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, रूपेश घोलप, शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे, विभाग अध्यक्ष हेमंत बोळगे, आशुतोष माने, केतन डोंगरे, संतोष वरे, नीलेश जोरी, सचिव मयूर शेवाळे, अक्षय पायगुडे आणि इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभाग बार आणि पब्जला मद्यविक्रीसाठी परवाना जारी करतो. परंतु 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री झाल्यास, उत्पादन शुल्क विभागाकडे त्या पबचा परवाना रद्द करण्याचा अधिकार आहे. तरीसुद्धा, अनेक ठिकाणी हा नियम 'अर्थपूर्ण' रीतीने पाळला जात नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. या तक्रारीसंबंधी भरारी पथकही प्रभावी कारवाई करत नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे पब्जमधील नियम अधिक काटेकोरपणे पाळला जावा, अशी मागणी प्रशासनाकडूनही व्यक्त होत आहे.