सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 पासून होणार आहे. त्याच दिवशी ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकारण्याचीही सुरुवात होईल. अर्जदारांना शेवटचा अर्ज सादर करण्याची संधी 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:55 पर्यंत असेल. त्याचप्रमाणे अनामत रक्कम ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत ठेवण्यात आली आहे. जे अर्जदार बँकेद्वारे RTGS/NEFT पद्धतीने रक्कम भरणार असतील, त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेतच पैसे भरावेत.
advertisement
सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्राथमिक यादी 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:०० वाजता प्रसिद्ध होईल. या प्राथमिक यादीवर दावे किंवा हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अंतिम यादी 17 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजता घरांच्या सोडतीचे आयोजन केले जाईल. यशस्वी अर्जदारांची नावे त्याच दिवशी सायंकाळी 6:00 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील.
या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सोयीसाठी अर्जदारांनी सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यावी. नोंदणी, अर्ज भरणे, रक्कम भरणे व सोडतीसंबंधी सर्व घडामोडी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे अर्जदारांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून अर्ज सादर करावा. ही संधी अनेकांसाठी स्वतःचे घर मिळविण्याची ठरू शकते.