खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधवी राजेश भुटाला यांनी आज उत्साहपूर्ण वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील पहिला महायुतीचा अर्ज खेडमधून दाखल झाल्याने महायुतीच्या एकतेचं आणि संघटनेच्या ताकदीचं प्रभावी दर्शन घडले. या प्रसंगी शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
वाजतगाजत अर्ज दाखल
advertisement
या नगरपरिषदेत महायुतीचे सर्व 21 उमेदवार विजयी ठरणार असून, खेड शहराच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा ठाम विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. मिरवणुकीचा प्रारंभ एस.टी. स्थानकातून झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, निवाचा चौक, महात्मा गांधी चौक, खेड बाजारपेठ, सिद्धिविनायक मंदिर, सोनार आळी मार्गे जात मिरवणूक नगरपरिषद कार्यालयात संपन्न झाली. तेथे सौ. माधवीताई भुटाला यांनी अधिकृतपणे आपला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला.
या वेळी कोण कोण उपस्थित होते?
या प्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना माजी आमदार तथा उपनेते संजयजी कदम, शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, माजी आमदार सदानंदजी चव्हाण, दापोली नगराध्यक्ष कृपाताई घाग, श्रेया कदम, माजी जि.प. बांधकाम सभापती अण्णा कदम, रवी उदय जाधव, भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे, संजयजी भुटाला, उद्योजक विलासभाई भुटाला, मंगेशजी भुटाला तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
