TRENDING:

MAHA Metro Recruitment 2025 : खुशखबर! महामेट्रोत काम करण्याची संधी, पगार लाखांहून अधिक; अर्ज कसा करावा?

Last Updated:

MAHA Metro Recruitment 2025 : महा मेट्रोन पुण्यात नोकरीसाठी भरती जाहीर केली आहे. यात विविध पदे उपलब्ध आहेत. रतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट पाहणे आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महामेट्रोने नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पांसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती काढली आहे. ही भरती विविध वरिष्ठ आणि तांत्रिक पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे. निवडलेल्या उमेदवारांना 5 वर्षांच्या करारावर किंवा प्रतिनियुक्तीवर कामावर नेण्यात येईल.
News18
News18
advertisement

महा-मेट्रोच्या कोणत्या विभागांमध्ये भरती?

ही भरती नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो आणि नवी मुंबई मेट्रो लाईन-1 प्रकल्पांसाठी आवश्यक कर्मचारी मिळवण्यासाठी आहे.

भरतीसाठी पदे आणि पात्रता:

1-चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (सिग्नलिंग) – नागपूर

पगार: 1,20,000–2,80,000 रुपये

पात्रता: बी.ई./बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशनमध्ये, 19 वर्षांचा अनुभव

2-डेप्युटी जनरल मॅनेजर (लँड मॉनेटायझेशन) – नागपूर

advertisement

पगार: 70,000–2,00,000 रुपये

पात्रता: एमबीए (फायनान्स), मेट्रो प्रकल्पातील मालमत्ता विकास व महसूल वाढीत 7 वर्षांचा अनुभव

3-डेप्युटी जनरल मॅनेजर (सेफ्टी & ट्रेनिंग) – पुणे

पगार: 70,000–2,00,000 रुपये

पात्रता: बी.ई./बी.टेक. (मेकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन), 7 वर्षांचा अनुभव

4-डेप्युटी जनरल मॅनेजर (E&M) – नागपूर

पगार: 70,000–2,00,000 रुपये

पात्रता: बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रिकल/मेकेनिकल), 7 वर्षांचा अनुभव

advertisement

5-सेक्शन इंजिनिअर (E&M) – नागपूर 4, पुणे 4

पगार: 40,000–1,25,000 रुपये

पात्रता: बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रिकल/मेकेनिकल), 3 वर्षांचा अनुभव

6-सेक्शन इंजिनिअर (सिग्नलिंग) – नागपूर 3, पुणे 3

पगार: 40,000–1,25,000 रुपये

पात्रता: बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन), 3 वर्षांचा अनुभव

7-सेक्शन इंजिनिअर (टेलिकम्युनिकेशन & AFC) – नागपूर 3, पुणे 3

पगार: 40,000–1,25,000 रुपये

पात्रता: बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन), 3 वर्षांचा अनुभव

advertisement

8-सेक्शन इंजिनिअर (पॉवर सप्लाय) – नागपूर 2, पुणे 2

पगार: 40,000–1,25,000 रुपये

पात्रता: बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रिकल), 3 वर्षांचा अनुभव

9-सेक्शन इंजिनिअर (OHE/TRD) – नागपूर 2, पुणे 2

पगार: 40,000–1,25,000 रुपये

पात्रता: बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रिकल), 3 वर्षांचा अनुभव

10-सेक्शन इंजिनिअर (IT) – नागपूर 1

पगार: 40,000–1,25,000 रुपये

पात्रता: बी.ई./बी.टेक. (कंप्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन), 3 वर्षांचा अनुभव

advertisement

अर्ज शुल्क:

SC, ST, महिला: 100 रुपये

UR, OBC (माजी सैनिकांसह): 400 रुपये

शुल्क ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरता येईल.

अर्ज पाठवण्याची पद्धत:

भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे 10 ऑक्टोबर 2025 पूर्वी खालील पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवावीत:

General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd., Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR-440010.

अर्ज करताना महत्त्वाचे म्हणजे अर्जामध्ये अर्ज केलेले पद आणि जाहिरात क्रमांक स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यांत केली जाईल वैयक्तिक मुलाखत, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. अंतिम निवडलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जाईल आणि पुढील सूचना महा-मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येतील.

मराठी बातम्या/पुणे/
MAHA Metro Recruitment 2025 : खुशखबर! महामेट्रोत काम करण्याची संधी, पगार लाखांहून अधिक; अर्ज कसा करावा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल