जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी फक्त कारवाई नाही, तर गौतमी पाटीलवर त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडून सहकार्य न मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
याबाबत चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी थेट डीसीपींना फोन करून प्रकरणाची माहिती दिली आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी विशेष पथक नेमले असून अपघातानंतर वाहन ज्या क्रेनच्या साह्याने हलवले गेले, त्या ट्रेनचालकाची चौकशी करण्यात आली आहे. पोलीस तपासातून समोर आले आहे की, अपघातानंतर गौतमी पाटीलच्या वाहनचालकानेच क्रेन अपघातस्थळी बोलवल्याचे उघड झाले आहे.
advertisement
या प्रकरणात पोलिसांवर दबाव वाढल्याचे दिसून येत आहे. चंद्रकांत पाटीलनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्रकरणाची माहिती देऊन त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ निरीक्षकांना प्रोग्रेस रिपोर्ट तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनाक्रमामुळे गौतमी पाटीलची परिस्थिती गंभीर होत आहे. अपघाताच्या भयंकर स्वरूपामुळे आणि रिक्षाचालकाच्या गंभीर स्थितीमुळे प्रकरणावर ऐनवेळी कायदेशीर आणि सामाजिक दोन्ही दबाव निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिक, राजकीय पक्ष आणि उच्च अधिकाऱ्यांचा लक्ष वेधून घेतल्यामुळे आता गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शहरात या अपघाताबद्दल तीव्र चर्चेचा आणि संतापाचा वातावरण आहे, आणि प्रकरण लवकरच न्यायालयीन आणि प्रशासनिक पातळीवर गती पकडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
