नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी अमित शेंडगे यांची मॅट्रिमोनी वेबसाइटवर ओळख झाली होती. लग्नाच्या भूलथापा देऊन अमितने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो पुण्यात आला. त्याने तरुणीला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या गैरकृत्याचे त्याने तरुणीच्या नकळत तिच्या खासगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.
advertisement
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या फोटो आणि व्हिडिओचा वापर करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने पीडित तरुणीकडे 2 लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास संबंधित फोटो आणि व्हिडिओ नातेवाईकांसह सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
जेव्हा तरुणीने लग्नाबद्दल विचारणा केली, तेव्हा आरोपीने आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच सुसाईड नोटमध्ये तिचे आणि तिच्या कुटुंबाचे नाव घेईल, असे धमकावले. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने अखेर खराडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.