सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 170 गाड्या कांद्याची आवक झाली आहे. 170 गाड्यांपैकी 15 ते 20 गाड्या पांढऱ्या कांद्याची आवक झाली आहे. सोलापूर जिल्हा सोडून अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची आवक सुरू आहे. कांद्याला 500 रुपयांपासून ते 1500 रुपये क्विंटल भाव मिळत आहे.
Weather Alert: शुक्रवारी राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, 15 जिल्ह्यांना अलर्ट
advertisement
क्वचित एका दुसऱ्या कांद्याला 1600 ते 1800 रुपये क्विंटल दर मिळत आहे. ज्या वेळेस कांद्याला मागणी होती त्यावेळेस सरकारने निर्यात शुल्क लावले आता कांदा बाजारात शिल्लक असून सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले आहे. कांद्याला भाव वाढेल या आशेने शेतकरी कांद्याची लागवड करत आहे. परंतु बाजारात कांदा शिल्लक असल्यामुळे कांद्याला दर वाढत नसताचा दिसत आहे, अशी माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पांढऱ्या कांद्याची आवक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 15 ते 20 गाड्या पांढऱ्या कांद्याची आवक झाली आहे. बाजारात आलेला हा पांढरा कांदा नवीन असून वेगळ्या व्यापाऱ्यांकडून त्याला मागणी आहे. पांढऱ्या कांद्याला सरासरी 800 रुपये ते 2200 रुपये पर्यंत बाजार भाव मिळत आहे. तर क्वचित एखादा पांढरा कांदा ला 2400 ते 2600 रुपये क्विंटल सुद्धा दर मिळत आहे. तर पांढऱ्या कांद्याला आंध्र प्रदेश, तेलंगणा या जिल्ह्यांमध्ये मागणी असल्याने या नवीन पांढऱ्या कांद्याला भाव आहे.