धनंजय कोळीचा अपघातात मृत्यू
जड वाहणे एकमेकांना धडकल्यानंतर धनंजय कोळी याची कार देखील दोन वाहनाच्या मधोमध आली अन् कारचा चुराडा झाला. त्यातच धनंजयचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. धनंजय कोळी याला तीन महिन्यांपूर्वी मुलगा झाला. अपघात झाला तेव्हा त्याची पत्नी आणि तीन महिन्याचा मुलगा लातूर येथे होते, तर आई-वडील पुण्यात असतात. तो आई-वडिलांकडे पुण्यात येत होता.
advertisement
तीन महिन्यांचं बाळ बापाच्या प्रेमाला पोरकं
अपघातावेळी कार चालवत असलेल्या धनंजय कोळी याला तीन महिन्यांपूर्वी मुलगा झाला. धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील आहे. धनंजय सहा महिन्यांपासून वाहतूक व्यवसाय करत होता. त्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याने काही नाटकांमध्ये भूमिकाही केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्याने स्वतःचा अभिनेता असा उल्लेख केला आहे.
एक वादळ अन् संसार मोडला
दरम्यान, धनंजय गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथील चिखली परिसरात राहत होता. नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यात एक वादळ आल्याने संसार मोडला आहे. तर तीन महिन्याच्या लेकराच्या डोक्यावरचं पृतूपत्र हरवलं आहे.
