TRENDING:

Fraud News: आधी ओळख, मग संबंध अन् शेवटी उच्चशिक्षित तरुणासोबत मोठा गेम; मॅट्रिमोनिअल साईटवर पुणेकरांसोबत होतोय भयंकर खेळ

Last Updated:

एका उच्चशिक्षित तरुणाला संकेतस्थळावरून तरुणीशी ओळख करणं महागात पडलं. ओळखीनंतर संबंध प्रस्थापित झाले आणि पुढे याच गोष्टीचा फायदा घेत तरुणीने त्याला बलात्काराची धमकी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी विवाह संकेतस्थळांचा वापर करणं आता अनेकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नाचं आमिष दाखवून सुशिक्षित तरुण-तरुणींना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे जाळे पसरले आहे. केवळ गेल्या सहा महिन्यांत शहरात ३० ते ३५ मोठे गुन्हे दाखल झाले असून, फसवणुकीचा आकडा काही लाखांपासून ते थेट साडेतीन कोटींपर्यंत पोहोचला आहे.
मॅट्रिमोनिअल साईटवर पुणेकरांसोबत होतोय भयंकर खेळ  (प्रतिकात्मक फोटो)
मॅट्रिमोनिअल साईटवर पुणेकरांसोबत होतोय भयंकर खेळ (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

फसवणुकीचा भयानक प्रकार

एका उच्चशिक्षित तरुणाला संकेतस्थळावरून तरुणीशी ओळख करणं महागात पडलं. ओळखीनंतर संबंध प्रस्थापित झाले आणि पुढे याच गोष्टीचा फायदा घेत तरुणीने त्याला बलात्काराची धमकी दिली. भीतीपोटी तरुणाने कर्ज काढून, बहिणीचे सोने गहाण ठेवून तब्बल ४३ लाख रुपये तिला दिले. अखेर मानसिक छळ असह्य झाल्याने तरुणाने पोलिसांत धाव घेतली. अशाच प्रकारे, परदेशातील 'सीईओ' किंवा 'डॉक्टर' असल्याचे सांगून अनेक महिलांनाही कोट्यवधींचा गंडा घातला जात आहे.

advertisement

हे भामटे बनावट प्रोफाईलद्वारे स्वतःला डॉक्टर, इंजिनिअर किंवा 'एनआरआय' असल्याचे भासवतात. त्यानंतर महागड्या गिफ्टचे आमिष, कस्टम ड्यूटीच्या नावाखाली वसुली किंवा 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून पैसे उकळतात. आयटी क्षेत्रातील तरुण आणि घटस्फोटित महिला यांना हे गुन्हेगार प्रामुख्याने लक्ष्य करत आहेत.

पोलिसांचे आवाहन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशक्य काहीच नाही! लहानपणी क्रिकेटची आवड, तिनं लग्नानंतर केलं असं, घरात 100 ट्रॉफ
सर्व पहा

सायबर सेलने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तीशी बोलताना आर्थिक व्यवहार करणे टाळावे. संशयास्पद पैशांची मागणी झाल्यास तत्काळ १९३० या हेल्पलाईनवर किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करावी. जोडीदार निवडताना घाई न करता कुटुंबाची आणि संबंधित व्यक्तीच्या कामाची खात्री करून घेणे आता काळाची गरज बनली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Fraud News: आधी ओळख, मग संबंध अन् शेवटी उच्चशिक्षित तरुणासोबत मोठा गेम; मॅट्रिमोनिअल साईटवर पुणेकरांसोबत होतोय भयंकर खेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल