शिवकुमार माळी बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये आले होते. आपल्या मुलीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "मुलीचे मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आज बारामतीत आलो होतो. बारामतीमध्ये येण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा मुलीची डेड बॉडी घेण्यासाठी आणि आज तिच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आलो आहे. माझी बायको या घटनेतून बाहेर आलेली नाही.' असं म्हणताना माळी यांचा कंठ दाटून आला.
advertisement
'कदाचित माझ्या मुलीचा जीव वाचू शकला असता'
"माझ्या मुलीच्या अपघाताबाबत VSR कंपनीने मला कुठलीही कल्पना दिली नाही. टीव्हीवर बातमी बघून मी बारामतीकडे आलो. आणि माझ्या मुलीची बॉडी ताब्यात घेतली. माझ्या मुलीच्या पायावरून मी तिथे बॉडी ओळखली. अचानक विमान बदलणे, अचानक पायलट बदलले.. या गोष्टी संशयास्पद आहेत. गाडीमध्ये फ्युल घेऊन गेल्याची माहिती मला मिळाली. ही गोष्ट बेकायदेशीर आहे. ही फ्लाईट सुरत वरून आलेली होती, पूर्णपणे ही भरलेली होती. विमानात अतिरिक्त इंधन असल्यामुळे हा प्रकार घडला असावा. इंधन कमी असतं तर कदाचित माझ्या मुलीचा जीव वाचू शकला असता, असंही माळी म्हणाले.
रोहित पवारांची मागणी योग्य
"रोहित पवार यांनी केलेली मागणी योग्य आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत असून या अपघाताची शहानिशा झाली पाहिजे. रोहित पवार यांच्या मताशी मी सहमत आहे. घातपाथ याची चौकशी झाली पाहिजे. न्यायालयीन असुद्या किंवा सीबीआने योग्य तो तपास करून यातील सत्य बाहेर आणसं पाहिजे, अशी मागणी शिवकुमार माळी यांनी केली.
"मला CBI कडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. योग्य रीतीने याबाबत चौकशी करून जो कोणी सापडेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.माझ्या मुलीला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. रोहित पवार प्रयत्न करूनही याबाबत सत्यता बाहेर येत नाही. त्यामुळे आम्हाला याबाबत जास्त अपेक्षा वाटतं नाही. गुन्हा आहे की नाही हे पुढील प्रकरण आहे, गुन्हा दाखल करून तपास करावा आणि सत्य बाहेर काढावं, असंही माळी म्हणाले.
'ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही'
ही घटना झाल्यानंतर लोक घाबरली आहेत, VSR कंपनीबाबत चौकही सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर सगळ्या गोष्टी बाहेर येतील. मला CBI कडून कोणतीही कल्पना दिलेली नाही. ब्लॅक बॉक्स हा जळू शकत नाही. ब्लॅक बॉक्स जळण्यासाठी 11 000 टेम्परेचरच पावर लागतो. त्यामुळे या ब्लॅक बॉक्समधील सत्य बाहेर आलं पाहिजे. ब्लॅक बॉक्स बाबत टीव्हीवर फेक न्यूज येत आहेत. हा तपासाचा भाग आहे त्यामुळे तपासून या सगळ्या गोष्टी बाहेर येतील.
कोणत्याही शासकीय यंत्रणेने तपास करू द्या. मी माझी मुलगी गमावलेली आहे. मला सरकारकडून अपेक्षा आहेत ते या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करतील
पिंकी माळी शेवटचं काय बोलली?
27 तारखेला सव्वादहा वाजता तिचं माझ्यासोबत फोनवर बोलणं झालं. मी उद्या अजितदादांसोबत जाणार असून मी तिथे पोहोचल्यावर तुम्हाला संपर्क करेल, असं तिने सांगितलं होतं. वेळ मिळाला तर दादांशी बोलणं करून देईल, असंही तिने सांगितलं होतं., पण आमचं कााही बोलणं झालंच नाही.
