महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रवर्गातील एकूण 524 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजाच्या युवकांना ओबीसी कोट्यातून फार्म भरता यावा, यासाठी
राज्यसेवा आयोगाने वेळापञकात बदल केला आहे. नवीन वेळापञकानुसार यापूर्वी ईडबल्यू मधून फॉर्म भरलेल्या मुलांना कुणबी दाखले असून ओबीसीतून परिक्षा देता येणार नव्हती. म्हणून आयोगाने mpsc च्या वेळापत्रकात बदल करून मराठा समाजाच्या मुलांना ही नवी संधी उपलब्ध करून दिलीय. या प्रक्रियेला वेळ देता यावा म्हणून परीक्षेची तारीख पुढे ढकललीय.
advertisement
काय म्हटलंय आयोगाने?
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता दिनांक 8 मे, 2024 च्या शुद्धिपत्रकानुसार एकूण 524 रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदी च्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता इतर मागास वर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती.
वाचा - हवं तर मला फाशी द्या, मी मनुस्मृतीला विरोध करणारच; आव्हाडांनी भाजपला सुनावलं
त्यास अनुसरून शासनाने, शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण 2024/प्र.क्र.137/आरक्षण-05, दिनांक 28 मे, 2024 अनुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे (OBC) जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा (OBC) दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयाधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेसाठी 6 जुलै रोजी होणारी परीक्षा आता 21 जुलै रोजी होणार आहे.
