TRENDING:

मुळशीत कुस्तीच्या आखाड्यात राडा, सिकंदरवर शेखवर उचलला हात; 11 लाखांची कुस्ती वादाच्या भोवऱ्यात

Last Updated:

वाद वाढण्याची शक्यता असताना सिकंदरचे गुरू विशाल हारगुळे स्वतः आखाड्यात उतरले आणि कुस्ती पुन्हा सुरू केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  महाराष्ट्राचा नामवंत मल्ल सिकंदर शेख याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे झालेल्या कुस्ती दरम्यान घडलेल्या गोंधळाची चर्चा रंगली आहे. महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने 17 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात तब्बल 11 लाख रुपयांची इनामी कुस्ती रंगली होती. या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून रोहिदास आप्पा यांची नियुक्ती करण्यात आली होती.
News18
News18
advertisement

सायंकाळी सुरू झालेल्या या कुस्तीला सुरुवातीपासूनच चुरशीचे स्वरूप प्राप्त झाले. दोन्ही मल्लांनी आपापल्या ताकदीचा आणि कौशल्याचा जोरदार प्रत्यय देत सुमारे एक तास अखंड झुंज दिली. आखाडा रंगात आला होता आणि उपस्थित प्रेक्षकांनी प्रत्येक डावावर टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. मात्र, तासाभरानंतर कुस्ती अधिक आक्रमक होत गेली. . दोघेही एकमेकांना भारी पडत होते. दरम्यान माऊली कोकाटे याने वारंवार सिकंदरच्या मानेवर जोरदार आघात करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला संयम राखत सिकंदरने प्रतिकार केला, मात्र आक्रमकता वाढताच दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

advertisement

आखाड्यात मोठी धावपळ

याच दरम्यान, आखाड्याबाहेर उभा असलेला माऊली जमदाडे याचा एक समर्थक अचानक आतमध्ये घुसला आणि सिकंदरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आखाड्यात मोठी धावपळ उडाली. काही क्षणांतच प्रेक्षक, आयोजक आणि पंचांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आयोजक पंचांनी दोन्ही मल्लांना बाजूला नेऊन वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

advertisement

सिकंदरचे गुरू उतरले आखाड्यात

वाद वाढण्याची शक्यता असताना सिकंदरचे गुरू विशाल हारगुळे स्वतः आखाड्यात उतरले आणि दोघांमध्ये समेट घडवून आणत कुस्ती पुन्हा सुरू केली. मात्र, अखेरीस कोणताही निकाल लागला नाही. आयोजकांनी परिस्थिती लक्षात घेऊन दोघांनाही विजयी घोषित करत सामना थांबवला.

सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

दरम्यान, सिकंदरवर हल्ला करणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेत सिकंदरने दाखवलेल्या संयमाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याने प्रसंगावधान राखले नसते तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेमुळे कुस्ती आखाड्यांतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘उद्यानाचा निधी खर्च होत नाही’, शिवप्रेंमींवर आली भीक मागण्याची वेळ, काय घडलं?
सर्व पहा

पुण्याचा 'तेजस' गुजरातमध्ये हरपला! 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची आस ठरली शेवटची; मांजरीतील 3 मित्रांचा हृदयद्रावक शेवट

मराठी बातम्या/पुणे/
मुळशीत कुस्तीच्या आखाड्यात राडा, सिकंदरवर शेखवर उचलला हात; 11 लाखांची कुस्ती वादाच्या भोवऱ्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल