मुंबई- पुणे प्रवास आता आणखीनच जलद होणार आहे. प्रवाशांच्या वेळेमध्ये आणखीनच कपात होणार आहे. 'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे मुंबई- पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळपास 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लोणावळा- खंडाळा विभागातील टायगर व्हॅलीजवळ उभारण्यात आलेला 650 मीटर लांबीचा केबल- स्टेड पूल आहे. ज्याचं जवळपास पूर्णत्वास आलेले आहे. या पूलामुळे मुंबई- पुणे प्रवास आणखीनच कमी होणार आहे.
advertisement
650 मीटर 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा पूल जमिनीपासून सुमारे 100 मीटर उंचीवर आहे. हा नवीन मार्ग सुरू झाल्यावर द्रुतगती मार्गावरील घाट सेक्शन टाळता येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तब्बल 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार असल्यामुळे प्रवाशांसाठी अनेकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल, हे नक्की. १३.३ किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रकल्पाच काम शेवटच्या टप्प्यात आहे.
