TRENDING:

Mumbai-Pune Expressway: 27 तास हायवे ठप्प; कोणाचं विमान हुकलं तर कोणाचा उपचार, पण 'त्या' टँकरमध्ये असं काय होतं?

Last Updated:

अनेक प्रवाशांना प्रश्न पडला की एक टँकर हटवायला २७ तास का लागले? त्याचे उत्तर त्या टँकरमधील भयानक वास्तवात दडले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग २७ तास हजारो प्रवाशांनी मृत्यूच्या सावटाखाली घालवले. कोणाला परदेशातील विमानासाठी एअरपोर्ट गाठायचे होते, तर कोणाला तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात पोहोचायचे होते. मात्र, आडोशी बोगद्याजवळच्या एका अपघाताने सर्वांचीच गती रोखली. अखेर प्रशासनाने जीवाची बाजी लावून हा मार्ग मोकळा केला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नेमकं काय घडलं?
advertisement

त्या टँकरमध्ये असं नेमकं काय होतं?

अनेक प्रवाशांना प्रश्न पडला की एक टँकर हटवायला २७ तास का लागले? त्याचे उत्तर त्या टँकरमधील भयानक वास्तवात दडले होते. या टँकरमध्ये 'प्रोपोलिन' (Propylene) नावाचा अत्यंत ज्वलनशील वायू होता. हा पदार्थ इतका धोकादायक होता की, एका लहानशा ठिणगीनेही मोठा स्फोट होऊन जीवितहानी झाली असती. टँकरमध्ये गॅसचा दाब इतका जास्त होता की, तो हाताळणे यंत्रणांसाठी मोठे आव्हान होते. हे केवळ टँकर हटवण्याचे काम नव्हते, तर ते एक 'डेंजरस' रेस्क्यू ऑपरेशन होते.

advertisement

तज्ज्ञ संस्थांची मदत: या ऑपरेशनसाठी बीपीसीएल (BPCL) आणि लाईन्स मॅकलॅक सारख्या नामांकित कंपन्यांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तज्ज्ञांना सुरुवातीला वाटले की केवळ एकच गळती आहे. मात्र, गॅसचा प्रवाह इतका वेगवान आणि मोठा होता की इतर गळती डोळ्यांना दिसून येत नव्हती.लगळती रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा (POP) वापर करून तात्पुरते प्लगिंग करण्याचा प्रयत्न झाला. अशा गंभीर घटनांमध्ये अनुभवातून आणि नवनवीन प्रयोगांतूनच मार्ग काढावा लागतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

advertisement

स्फोट टाळण्यासाठी 'टीम वर्क'

महामार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि तांत्रिक पथकाने एकत्रितपणे काम केले. "कुठलाही स्फोट होऊ नये आणि जीवितहानी टाळली जावी" या एकाच ध्येयाने ही टीम २७ तास झुंजत होती. वायूचा दाब सुरक्षित मर्यादेत आल्यानंतरच क्रेनच्या साहाय्याने टँकर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सद्यस्थिती: तिन्ही लेन सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

प्रशासनाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आडोशी बोगद्याजवळील तो अपघातग्रस्त केमिकल टँकर आता सुरक्षितपणे बाजूला करण्यात आला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. जरी वाहतूक संथ असली, तरी अडकलेल्या हजारो प्रवाशांची अखेर सुटका झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway: 27 तास हायवे ठप्प; कोणाचं विमान हुकलं तर कोणाचा उपचार, पण 'त्या' टँकरमध्ये असं काय होतं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल