TRENDING:

Mumbai-Pune Expressway: थंडी अन् पाण्याच्या थेंबासाठी वणवण; एक्सप्रेसवेवर हजारो प्रवाशांनी अनुभवला 'जिवंत नरक', 27 तास त्यांच्यासोबत काय घडलं?

Last Updated:

वाहन चालक, लहान मुले, वृद्ध आणि महिला... हजारो प्रवासी रस्ते आणि बोगद्यांमध्ये अडकले होते. महामार्गावर जवळपास एकही हॉटेल किंवा दुकान नसल्याने अनेकांना सलग १०-१२ तास पोटात अन्नाचा कणही घेता आला नाही

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी रात्री जो काळोख पसरला, तो प्रचंड भयानक होता. टँकर उलटल्याच्या एका घटनेने सलग २८ तास हजारो जीव घाटात कोंडले गेले. पण हा प्रवास केवळ वेळेचा नव्हता, तर तो होता उपासमारीचा, हतबलतेचा आणि व्यवस्थेच्या क्रूर थट्टेचा.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरच्या त्या 27 तासांत माणुसकीच 'जाम'
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरच्या त्या 27 तासांत माणुसकीच 'जाम'
advertisement

प्रशासनाच्या 'सौजन्याने' उपासमार!

वाहन चालक, लहान मुले, वृद्ध आणि महिला... हजारो प्रवासी रस्ते आणि बोगद्यांमध्ये अडकले होते. महामार्गावर जवळपास एकही हॉटेल किंवा दुकान नसल्याने अनेकांना सलग १०-१२ तास पोटात अन्नाचा कणही घेता आला नाही. "आम्ही हतबल होऊन रस्त्यावर बसलो होतो, पण साधी पिण्याच्या पाण्याची सोयही प्रशासनाकडून झाली नाही," अशा शब्दांत प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.

advertisement

माणुसकी विसरून 'लूटमार'

एकीकडे प्रवाशांच्या डोळ्यात पाणी होते, तर दुसरीकडे काही संधीसाधू विक्रेते त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत होते. कोंडीत अडकलेल्या भुकेल्या प्रवाशांना १५ रुपयांचा वडापाव ३० रुपयांना, २० रुपयांची पाण्याची बाटली ४० रुपयांना, तर १० रुपयांचा बिस्किटाचा पुडा १५ ते २० रुपयांना विकला जात होता. भूक मोठी की पैसा? या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी एक्सप्रेसवेवर 'पैसा' असंच मिळालं.

advertisement

आयआरबीची 'टोल वसुली' सुरूच!

आश्चर्याची आणि संतापजनक बाब म्हणजे, वाहनांच्या रांगा ३० ते ४० किलोमीटरपर्यंत गेलेल्या असतानाही आयआरबीने (IRB) टोल वसुली थांबवली नव्हती. प्रवाशांना रस्त्यात कोणतीही सुविधा देता आली नाही, पण टोल नाक्यावर मात्र त्यांच्याकडून सक्तीने पैसे वसूल केले जात होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

महामार्गावर ना खाण्यापिण्याची सोय, ना स्वच्छतागृह. अशा परिस्थितीत तिथे 27 तास अडकलेल्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल, याचा विचारही प्रचंड भयंकर आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway: थंडी अन् पाण्याच्या थेंबासाठी वणवण; एक्सप्रेसवेवर हजारो प्रवाशांनी अनुभवला 'जिवंत नरक', 27 तास त्यांच्यासोबत काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल