पुण्यात जागा वाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना शिवसेनेत प्रचंड नाराजीचा सूर असल्याचं दिसून आले. महायुतीमधील हेवेदावे आणि धूसफूस जरी कितीही लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी तो आता चव्हाट्यावर येत आहे. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते दिसलं आहे. शिवसेनेचा नेता बैठक सोडून तावातावाने उठून गेल्याचं दिसलं आणि चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यात शिवसेनेत प्रचंड नाराजीचा सूर आहे.
advertisement
पुण्यातील शिवसेनेच्या बैठकीतून शहर प्रमुख नाना भानगिरे बाहेर पडले. नाना भानगिरे शिवसेना बैठकीतून रागात बाहेर पडले. त्यांना यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते थेट निघून गेले. शिवसेनेतील नाराजी नाट्य पुन्हा समोर आलं आहे. युती म्हणून जागा वाटप होताना सेनेच बिनसलं. पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये सेनेची बैठक सुरू होती त्यावेळी हा प्रकार धडल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे जागांच्या वाटाघाटीसाठी ठाण्यातील वर्तकनगरमध्ये भाजपा कार्यालयात जिल्हा पातळीवरील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, ही बैठक मध्यरात्रीपासून सुरू होऊन पहाटे ४ वाजेपर्यंत चालली, तरीही दोन्ही बाजूंकडून होणारी ओढाताण थांबलेली नाही. हा तिढा सोडवणं महायुतीसाठी हळूहळू डोकेदुखीचं होत चाललं आहे. त्यामुळे महायुतीचं टेन्शनही वाढलं आहे. एकीकडे उबाठा आणि मनसे यांची युती राजकीय वर्तुळात नवं वळणं घेऊन आली असताना महायुतीमध्ये मात्र अजूनही जागा फायनल होत नसल्याचं दिसत आहे.बैठकीत ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही महापालिकांच्या जागावाटपावरून दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची रस्सीखेच पाहायला मिळाली.
