TRENDING:

Gas Crisis: '100 टक्के!'; घरगुती गॅसचाही तुटवडा होणार? मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी 100 टक्के खात्री देत सांगितली 'ही' मोठी गोष्ट

Last Updated:

नागरिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या भीतीने सिलिंडर घेण्यासाठी रांगा लावत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : आखाती देशांमधील युद्धामुळे सध्या जगभरात इंधन आणि गॅस पुरवठ्याचं संकट उभं ठाकलं आहे. भारतातही याचे परिणाम पाहायला मिळत आहे. पुण्यातही व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागरिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या भीतीने सिलिंडर घेण्यासाठी रांगा लावत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. "घरगुती गॅसचा पुरवठा कमी होणार नाही, याची १०० टक्के काळजी सरकारने घेतली आहे," अशी महत्त्वाची ग्वाही त्यांनी दिली.
घरगुती गॅस सिलिंडरबाबत मोठी ग्वाही
घरगुती गॅस सिलिंडरबाबत मोठी ग्वाही
advertisement

व्यावसायिक गॅसवर मर्यादा, घरगुती ग्राहकांना प्राधान्य

मंत्री मोहोळ यांनी स्पष्ट केले की, युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या घरातील चूल विझू नये, यासाठी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरला (LPG) सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे. "घरगुती गॅस कुठेही कमी पडणार नाही, याची सरकारने पूर्ण खबरदारी घेतली असून जनतेने अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

advertisement

इस्त्रायल-इराण युद्धाचा इंटरनेटला फटका? भारतातील डिजिटल सेवांवर काय होईल परिणाम?

काळाबाजार करणाऱ्यांना कडक इशारा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

गॅस टंचाईचा गैरफायदा घेऊन काही वितरकांकडून सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यावर बोलताना मोहोळ म्हणाले की, "गॅस एजन्सींनी काळाबाजार केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे." घरगुती गॅसबद्दल मोहोळ यांनी ग्वाही दिल्याने सामान्य नागरिकांसाठी निश्चितच ही काळजी मिटवणारी बातमी आहे

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Gas Crisis: '100 टक्के!'; घरगुती गॅसचाही तुटवडा होणार? मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी 100 टक्के खात्री देत सांगितली 'ही' मोठी गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल