नेमकी घटना काय?
श्रीश सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरातील लक्ष्मीची भंगलेली मूर्ती विसर्जित करण्यासाठी धायरी फाट्याजवळील कॅनॉलवर गेला होता. त्याच्यासोबत परिसरातील इतर दोन-तीन मुलेही होती. रात्री उशिरापर्यंत श्रीश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. विसर्जित केलेली मूर्ती कॅनॉलमध्ये सापडली, पण श्रीशचा काहीच पत्ता लागला नाही.
advertisement
कपडे आणि मोबाईलने वाढवलं गूढ
मंगळवारी सकाळी या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं. श्रीशचा मोबाईल आणि त्याने अंगावर घातलेले कपडे काही मुलांनी त्याच्या सोसायटीसमोर आणून टाकले. ज्या मुलांनी हे साहित्य तिथे आणले, ते कोण होते आणि श्रीशचे कपडे त्यांच्याकडे कसे आले, या प्रश्नांमुळे प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे.
दोन मुले ताब्यात
या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी संशयावरून त्याच परिसरातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासासाठी हा गुन्हा नऱ्हे पोलीस ठाण्यातून आता नांदेड सिटी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. कॅनॉल परिसरात शोधमोहीम राबवली जात असून, ताब्यात घेतलेल्या मुलांची कसून चौकशी केली जात आहे.
