पाच लोकांचा जागीच मृत्यू
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार अपघातात मृत्यू झालेले हे 5 जण नारायणपूर येथील एका मंदिराला भेट देऊन घरी परतत होते. या दुर्घटनेत बळी पडलेले पाचही जण तीन वेगवेगळ्या कुटुंबांतील होते, ज्यामुळे मृतांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ते सर्वजण मंदिराहून घरी परतत असताना, काही किलोमीटर अंतरावर त्यांच्या घरापासून जवळच हा भीषण अपघात झाला, ज्यामुळे कारमधील सर्व पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
3 वर्षांची लहान मुलीचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील धायरी (Dhairi) येथील एका कुटुंबाने हा प्रवास सुरू केला होता. या प्रवासात एक पती-पत्नी आणि त्यांची मुलगी यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत असलेल्या ड्रायव्हर कम चालक हा त्या कुटुंबाचा मित्र होता. या चार जणांव्यतिरिक्त, कारमध्ये असलेली 3 वर्षांची लहान मुलगी ही चिखली येथील एका दुसऱ्या कुटुंबातील मित्राची मुलगी होती, असे पोलिसांनी सांगितले.
राजस्थान पासिंगचा एक कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेनं जात होता. नवले पुलावर सेल्फी पॉईंट असलेल्या भागात या ट्रकचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. उतारावर मोठ्या प्रमाणावर लहान स्पीड ब्रेकर आहेत, त्यामुळे ब्रेक फेल झाल्याची शक्यता आहे, असं डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितलं आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणतात, "पुणे-बेंगळुरू महामार्गावर आज नवले पुलाजवळ एका जड वाहनाने नियंत्रण गमावलं याच कारणामुळे हा अपघात घडला. जड वाहनाने अनेक वाहनांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हजेरी लावली आणि परिस्थिती हाताळली. ट्रॅफिक देखील आता सुरळीत झालं आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आम्ही मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
