बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. याआधीही ते आपण बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत दिलेत. अजित पवार यांच्या जागी त्यांचे पूत्र जय पवार यांना संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. बारामतीत सुपा इथं बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आय़ोजित केला होता. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
advertisement
अजित पवार म्हणाले की, हातातल्या या राख्यांकडे बघून सांगतो की ज्या मायमाऊलींनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आधी छाती ठोकपणे सांगायचं बघा आमची बारामती बघा, पण आता भीत भीत सांगतो हाय आमची बारामती आहे. मला सांगतो हाय मी हाय, त्यांना आल्यावर त्यांना सांगा हाय मी हाय.
कुणी मंडळांना पैसे वाटले ते हक्काने घ्या पण बटन दाबायचं तेच दाबा. तुमचा चेहरा एक शब्द आहे तो मला खोडायचा आहे. पण तुमची आम्हाला साथ पाहिजे. राज्यात छाती ठोकपणे सांगायचं की एक लाख 68 हजार मतांनी निवडून आलोय राज्याचे महत्त्वाचे नेते त्यात माझी गणती होती ती तुमच्यामुळे. तसंच जेवढे तुम्ही मतदान केलं तेवढा जास्त निधी मी बारामतीत आणला राज्यात सगळ्यात जास्त निधी बारामतीला आणलाय असंही अजित पवार यांनी म्हटलं.
तुम्ही जे लोकसभेला करायचं ते केलं मी त्याची नाराजी व्यक्त केली नाही. मागच्यावेळी जेवढी लोक तुम्हाला भेटायला येतील तेवढी येणार नाहीत. यंदाच्या वेळेस मी जो उमेदवार देईल, त्याचा अर्ज भरायचा असेल तेव्हा तुम्हाला कळेल असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा बारामतीतून न लढण्याचेच संकेत दिले. अजित दादांनी असं म्हणताच कार्यकर्ते आक्रमक झाले होते.