"मला मॅनेज करणारा अजून जन्माला यायचा आहे"
यावेळी गडकरींनी आपल्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना म्हटलं, "मी दांडकं घेऊन बसलोय, मला मॅनेज करणारा अजून जन्माला यायचा आहे. अच्छा काम करो, नहीं तो मै ठोकता हूं !" त्यांच्या या विधानाने असंही थेट शब्दांत त्यांनी सांगितलं. गडकरींनी स्पष्ट केलं की, देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत.
advertisement
"आम्ही दुसऱ्याच्या छातीवर चढू शकतो"
पेट्रोलियम लॉबीच्या अडथळ्यांवर बोलताना गडकरी अधिक आक्रमक झाले. ते म्हणाले, "जे लढाई सोडून पळतात, ते संपतात. भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. आम्ही सुद्धा दुसऱ्याच्या छातीवर चढू शकतो! आम्ही चढू, लढू, जिंकू आणि यशस्वी होऊ." आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण अनेक अशक्य वाटणाऱ्या योजना यशस्वी करून दाखवल्या आहेत, असंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं.
पुण्यातील या कार्यक्रमात त्यांनी तरुण उद्योजकांना आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात काम करणाऱ्यांना आत्मविश्वास न सोडण्याचं आवाहन केलं. गडकरींची ही 'दमदार' टोलेबाजी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
