पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी चांद्रयान मोहिमेपासून ते शासकीय कामकाजाबद्दल भाष्य केलं. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील फुटीबद्दल केलेल्या विधानाबद्दल विचारणा केली, त्यावर अजितदादांनी लगेच उत्तर दिलं.
(Pimpri : अजितदादांचे भव्य स्वागत, क्रेनने हार अन् जेसीबीने पुष्पवृष्टी; पगडीतला लूक व्हायरल)
'नो कॉमेंट्स, म्हटल्यावर प्रश्न येतो कुठे दुसरं काही बोला ना, अरे विकासाच्या मुद्यावर बोला ना, शहराचे प्रश्न, त्यामध्ये कशी पारदर्शकता येईल, त्यात कसं काम करता येईल, सर्वसामान्य लोकांना विकास पाहिजे आहे, त्यावर आपण बोललं पाहिजे, अशी प्रतिक्रिया देऊन पुढे बोलण्याचं टाळलं.
advertisement
मी अजित पवार आमचे नेते असं म्हटलोच नाही -शरद पवार
दरम्यान, शरद पवार सध्या साताऱ्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी अजितदादांबद्दल केलेल्या विधानावर खुलासा केला आहे.
'आमचे नेते मी म्हटलो नाही, सुप्रिया सुळे या त्यांची धाकटी बहिण आहे, बहिण भावाचे नाते आहे, त्यांनी तसं म्हटलं असेल. त्या बहिण भावाचे नाते आहे, त्या बोलल्या असतील तर राजकीय अर्थ काढायची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.
('..हा तर मोठा गेम'; बच्चू कडूंनी पवारांना टोला लगावत सांगितला राष्ट्रवादीचा पुढचा प्लॅन)
'एकदा दुसऱ्यांदा त्यांनी वेगळी अशी भूमिका घेतली असेल तर त्या करेक्शन केले असेल त्याबद्दल भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला होता, त्याच्यामध्ये आमचे सहकारी सहभागी झाले होते. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर जे काही झालं ते योग्य काम झालं नाही, पुन्हा अशी भूमिका घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.अशी भूमिका त्यांनी घेतली होती, त्यानंतर एक संधी म्हणून त्यांना संधी दिली होती, संधी सारखी मागायची नसते आणि संधी सारखी द्यायची नसते. संधी मागायची नसते आणि जर मागितली तर द्यायची नसते. आता आमची भूमिका दुसरी आहे, असंही पवार म्हणाले.