मुख्य संशयित शीतल तेजवानी फरार?
प्रकरणात जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असताना आता मुख्य संशयित शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. शीतल तेजवानीविरुद्ध दोन गुन्हे दाखल असून, तिचा मोबाईल फोन बंद आहे. ती आपल्या पतीसह देशाबाहेर पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. दोन्ही नवरा आणि बायको राहत्या पत्त्यावर आढळून आलेली नाही.
advertisement
निलेश घायवळप्रमाणे हातावर तुरी दिल्या?
शीतल तेजवानीचा गुन्हेगारी इतिहास मोठा असून, यापूर्वी तिने सेवा विकास बँकेला 41 कोटींचा घोटाळा केला होता. तिचा पती सागर सुर्यवंशीसोबत तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे दहा कर्जे घेतली आणि त्यांचा गैरवापर केल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई करत सुमारे 45 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यामुळे शीतलने देखील निलेश घायवळप्रमाणे पुणे पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या का? असा सवाल विचारला जात आहे.
दहा बनावट कर्ज
दरम्यान, सेवा विकास बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सागर सूर्यवंशीला काही दिवसांपूर्वी सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ईडीकडून अटक झाली होती. तर शीतल अटकपूर्व जामीन मिळवण्यात यशस्वी झाली होती. त्यामुळे केवळ कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणातच नव्हे तर बँकेच्या बनावट कर्ज प्रकरणातही शीतल तेजवाणी मुख्य आरोपी असल्याचं आता समोर आलं आहे. आरोपी शीतल तेजवाणी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांनी द सेवा विकास बँकेच्या विविध शांखांमधून दहा बनावट कर्ज घेतली होती.
