काय आहे नेमके प्रकरण?
आत्महत्या करणारी ५७ वर्षीय व्यक्ती मुंबईतील महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत होते. या सततच्या वादाला ते कंटाळले होते. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी त्यांनी आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला.
advertisement
कॉलवर बोलत असतानाच त्यांनी बहिणीला सांगितले की, "पत्नी आणि मुलींसोबत होणाऱ्या रोजच्या भांडणांमुळे आणि सततच्या त्रासामुळे मी आता आत्महत्या करत आहे." हे बोलून त्यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं.
पत्नी आणि मुलींवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर मृताच्या बहिणीने पोलिसांकडे धाव घेतली. सततच्या कौटुंबिक कलहामुळे आणि त्रासामुळेच भावाने आत्महत्या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांची पत्नी आणि दोन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्वती पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
